अगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम
सरगम ही छेडून यव्वन जाई … सूर हा नवा
भासांचे छेडी धुंद तराणे वेडी हवा
क्षितीजावर रंग नवे,
आशांचे पंख हवे
स्वप्नांचे चे पैजण बाई होऊ बेभान पुन्हा
अगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम
श्वासही नवे भासही नवे
प्रश्नही नवे सारे
नेमके किती मावतील या
ओंजळी मधे तारे
मेघात दाटलेल्या
वादात खोण घेऊ
धाकात राहुनी चिंब सरींच्या गाउया
अगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम
पाव इन तारोंको झुमे पाकर आसमां…
चलो चुराते है भवरोंसे गुन गुन ती कर ये हवा
जाने जरा दिशाओंसे
क्यू निला है आसमा
अौर पुछले घटाओंसे
क्यू है गरजती बता दे जरा
अगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम
ढुंडे हम जोश हा वेडा
पागल हम जरा
हसू जारासे बेभान आम्ही
ये दम है नया
स्पर्धा करू तुफानाशी
आवेश का खरा
आभाळ भेदण्यासाठी
चिंता जगाची कशाला करा
अगडबम ब बम बम ब बम बम ब बम अगडबम ब बम
ये दिली कोंबड्याने बांग
तवा काय झाल सांग
रात चांदण्यात कुठवर न्हाली
उगा लाजू नको अाता
सारं सांग भसा भसा
काय रातीच्याला धाम धुम झाली
ये बाबो बाबो बाबो
थोडी धाक धुक उरी
त्यात कार कुर करी
जुन्या पाटलाने केला हो राडा
कसा सोडवावा कोडा
कशी गाडी न्यावी पुढा
याचा आर्ध्यात आडला घोडा
म्हणे करु तरी काय
काय सुचेना उपाय
सुरू घाल मेल काळजात झाली
उगा लाजू नको अाता
सारं सांग भसा भसा
काय रातीच्याला धाम धुम झाली
ये बाबो बाबो बाबो
काल रातीच्याला काय झाला बाबो
पानी पानी काळजाचा झाला बाबो
मन कुठवर हारवला बाबो
आता हालकीस शहारला बाबो
वट वट मधी फुटलाका बाबो
किती उरा मधे गटापला बाबो
गडी झाला उतावळा जीव जळ कोळा कोळा
मन आता मला सोसवत नाही
तिचा धरू जरा हात
केला आंधारान घात
गेला धाडकान खाटल्याच्या काहली
गडी झाला उतावळा जीव जळ कोळा कोळा
मन आता मला सोसवत नाही
तिचा धरू जरा हात
केला आंधारान घात
गेला धाडकान खाटल्याच्या काहली
असा चांद गोरा गोरा
सुटे मदनाचा वारा
सुरू काकणाची किण किण झाली
उगा लाजू नको अाता
सारं सांग भसा भसा
काय रातीच्याला धाम धुम झाली
ये बाबो बाबो बाबो
दिली कोंबड्याने बांग
तवा काय झाल सांग
रात चांदण्यात कुठवर न्हाली
उगा लाजू नको अाता
सारं सांग भसा भसा
काय रातीच्याला धाम धुम झाली
ये बाबो बाबो बाबो
कुठल्या इंद्राची रंभा तू उमजना
कुठल्या रानी चा तोरा तुझा
नखरा माझा हा असाच लय भारी
फुक्का तू होशी येडा पिसा
धिकारी धिकाट वाजतय उर्रात
उडतया काळीज दना दना
घे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालुया सन्नानना
तुझ्या या रुपान पिसाटल रान
भांबावला पार वारा
तुझ्या र नादान झाले मी बेभान
सुटलाया भान जरा जरा
की कशाला झिंग सांग आली मला
धुंद धुंद प्रितीची ही जाईल नशा
झालाय भर्रात शिंगार डोळयात
करतोया एकांत खाणा खुणा
दे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालुया सन्नानना
तुझ्या या डोळ्याच्या गुललाबी जाल्यात
गुत्ताडुनी जीव गेला
सुचना रुचना डोस्कच चालेना
ओळख पटेना माझी मला
का ग मी तुझी ग आज राणी आदा
सैरा भैर आसमंत झाला फिदा
बोलून लाड्डात मधाच तू बोट
कशाला लाविशी पुन्हा पुन्हा
घे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालुया सन्नानना
कुठल्या इंद्राची रंभा तू उमजना
कुठल्या राणीचा तोरा तुझा
धिकारी धिकाट वाजताया उर्रात
उडताया काळीज दना दना
घे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालुया सन्नानना
असे फाटले आभाळ त्याला ठिगळ पुरेना
पिळ काळजाचा जणू सोडवेना सोसवेना
सोडवेना सोसवेना
विजताच पेटतात दिवे….
आशेचे उरात
कधी दाटता काळोख
सुख दे सावल्यांची साथ
आस तुटता तुटेना
ध्यास सुटता सुटेना
पिळ काळजाचा जणू सोडवेना सोसवेना
सोडवेना सोसवेना
सैरा वैरा पिसापरी जळे…
जीव वणव्यात
होई पिसाट पिसाट
झुरे मन अंधारात
जाई हरखून त्याचहा
ढंग त्यालाच कळेना
पिळ काळजाचा जणू सोडवेना सोसवेना
सोडवेना सोसवेना
असे फाटले आभाळ त्याला ठिगळ पुरेना