www.guruthakur.in
  • Search
  • Menu
  • Twitter
  • Facebook

Ardhya Halkundane

Chalate Nane Jayache

चालते नाणे जयाचे फक्त आहे भाव त्याला
भाव सरता नाव विरते घाव त्याचा काळजाला

जोडल्या विन हात जातो रोजचा भावीकही
त्या क्षणाला शेंदराचे मोल कळते पत्थराला

सूर जुळता ऐकू येती हुंदक्यांतनु ही तराणे
मी पणाचा डंख होता मैफिली जाती लयाला

झोकूनी तुफान जाती कस्पटेही आसमंती
वादळे मिटताच जातो डौल त्यांचा ही लयाला

उगवत्याला जोडती कर रीत आहे या जगाची
मावळाया जो निघाला दावती का पाठ त्याला

Ardhya Halkundan

रूबाब मारतंय सोन्यावानी झालंय पिवळं बेनं
अर्ध्या हळकुंडानं हे अर्ध्या हळकुंडानं

तेनं सोडलिया लाज अन दावतंय माज
हे फुकाचा खोटा नाटा
पार कमरेचं सोडुन डोइला बांधतंय
गावामंदी बोभाटा
आडव्यात शिरतंय ऊगाच नडतंय
फिरतंया तो-यान
अर्ध्या हळकुंडानं हे अर्ध्या हळकुंडानं

करी रोज नवी थेरं जेजे बघिल ते सारं
याच वागनं भलतंच न्यारं
रोज टाकतंय कात यानं आनलाय वात
जनू कानात शिरलंया वारं
भलतंच हाल्लय फुगत चाल्लय
सुक्काळीचं गर्वानं
अर्ध्या हळकुंडानं हे अर्ध्या हळकुंडान

Ulti Hai ye Duniya Sari

ऊलटी है ये दुनिया सारी…ऊल्टा चक्कर सारा
सीधे धंदे हो जाते है पल मे नौ दो ग्यारा
जी ले अपनी मस्ती मे मरता है डरनेवाला
भिंड जा नडजा लाईफसे टेन्शन को मार के ताला

माल का ही ताल है ये जिसपे दुनिया नाचे
अपने अपने फंडे सबके अपने अपने ढाचे
नाम बड़े है जितने इनके उतने दर्शन.छोटे
चिंदीचोरी में लगे ये सारे सिक्के खोटे
हर कदम पर मिल जाएगा एक नया घोटाला
भिंड जा नडजा लाईफसे टेन्शन को मार के ताला

वोटोंके भूखे कौवे बैठे है डाली डाली
गिनती मे इनकी देखो पब्लिक तो चू है साली ँ
बिकतीहै नियत जिसकी तेजीमे उसकाधंदा
जो सचके पिछे भागा मर जाए डालके फंदा
Granted है अब तो भिडू हर काम मे झोलमझाला
भिंड जा नडजा लाईफसे टेन्शन को मार के ताला

Waali Tu Lekarancha

वाली तू लेकरांचा अन तूच पाठीराखा
फिरवून पाठ जाशी का सांग मायबापा
न्हाई देवा भूक मोठी चूक माझी घाल पोटी
जीव दारी रे तुझ्या हा टांगला….
विठठला… विठठला… विठठला…

आस वेडी झाली बेडी धावताना तोल गेला
फासली मी राख देवा तू दिलेल्या हुन्नराला
बाधली रे मोहमाया आज माघारी फिराया
वाट दावी तूच आतारे मला ….
विठठला… विठठला…

लागे स्वार्था चा डोहाळा
तैसा हव्यासाचा लळा
रोमरोमी भिनलेला
कैसा सोडू सांग चाळा
विठठला विठठला विठठला विठठला

काम क्रोध अहंकार
गेला गोठून विचार
नको आता येरझार
तुझं वाजवितो दार
विठठला विठठला विठठला विठठला

माया मोह वासनेचा
जन्म भोवरा आशेचा
पिळ जाईना सुंभाचा
मार्ग दावी परतीचा
विठठला विठठला विठठला विठठला

Kunapaai Aalo

कुनापाई आलो कशापाई आलो मांडला ह्यो काहूनी पसारा
कुन्या दिशेला हा चालला प्रवास भेटल गा कोन्या ठाई थारा
ऊमगना काही देवा डोई तुझ्या पाई देवा
काया तुझी छाया तुझी तुझा देह सारा
विठठला पांडुरंगा विठठला पांडुरंगा
अथ तुझी इति तुझी तूची दावी वाट गा …..

‘मी’ पनाच्या पायी राहिलो कोरडा
रिकामाच घडा जन्मभरी
आज ध्यानी येता हव्यासाची बेडी
आणीक बेगडी सुखे सारी
ऊमगना काही देवा डोई तुझ्या पाई देवा
काया तुझी छाया तुझी तुझा देह सारा
विठठला पांडुरंगा विठठला पांडुरंगा
अथ तुझी इति तुझी तूची दावी वाट गा

होवूनी बेभान सोडीयेलं रान
खुळ्या पाखरानं मोहापाई
आता लागूनिया आभाळाची आस
प्राण कासावीस त्याचा होई
ऊमगना काही देवा डोई तुझ्या पाई देवा
काया तुझी छाया तुझी तुझा देह सारा
विठठला पांडुरंगा विठठला पांडुरंगा
अथ तुझी इति तुझी तूची दावी वाट गा

Ghuma Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in[nolink] | Powered by: Mastrait
Scroll to top
WP-Backgrounds Lite by InoPlugs Web Design and Juwelier Schönmann 1010 Wien