प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झणकारते मनी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा
ना तुला बोलवे, ना मला बोलवे
नयन हे बोलती एकमेकांसवे
धुंद गंधात न्हाउनी, गीत ये आकारुनी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा
जीव आसावला, कंपने हि नवी
ऐकू येते उरी, स्पंदने हि नवी
स्वप्न डोळ्यात देखुनी, साज छेडीत ये कुणी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा
सांजवेळी सांजरंगी रंगले मन हे
पावलांना साद देती या दिशा
सनन सन सूर हे नवे
फुलून मन गाई त्या सवे
ओठांवर येई सरगम
भिरभिर या अंबरी, नभाच्या उरी
वाटते उंच उंच विहरावे
रंग निळे जांभळे, ऊन कोवळे
लेउनी पंखांवर मिरवावे
वारयातले सूर फुलवीत यावी ओठांवरी
यावी ओठांवरी सरगम
गहिवरल्या या क्षणी, वाटते मनी
रेशमी स्वप्न नवे उमलावे
नकळत यावे कुणी, मेघ होऊनी
हरपुनी भान असे बरसावे
मौनातले अर्थ खुलवीत यावी ओठांवरी
यावी ओठांवरी सरगम
तू, साँसों मे हैं तू, धडकनों मे तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
हळव्या दवात भिजली पहाट तू
हळुवार सांज की चांदरात तू
शब्दाविना बोलणारा, स्पर्शातुनी सांगणारा
मुका गोड अनुराग तू
तू, साँसों मे हैं तू, धडकनों मे तू
चिंब ओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
गंधीत श्वास की स्वप्नभास तू
लागे जिवास तो एक ध्यास तू
का वाटते कोण जाणे, धुंदावल्या श्रावणाचा
सख्या स्वैर अनुवाद तू
तू, साँसों मे हैं तू, धडकनों मे तू
धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
तू, साँसों मे हैं तू, धडकनों मे तू
चिंब ओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू
क्षणभर विश्रांती या जगण्यासाठी
क्षणभर विश्रांती मोहरण्यासाठी
विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी
क्षणभर विश्रांती…
दूरची वाट अन स्वप्नातली दूर गावे
जायचे नेमके कोठे कुणाला न ठावे
थांबती, संपती जुळती नव्या रोज वाटा
सूर त्यांच्यासवे या जीवनाचे जुळावे
विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी
क्षणभर विश्रांती…
आवरावे जरा बेभानल्या पावलांना
सावरावे जरा स्वप्नाळल्या लोचनांना
गीत ओठी नवे घेवूनी या जीवनाचे
गुंतवावे जरा भांबावलेल्या मनाला
विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना
चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी
क्षणभर विश्रांती..