Konte Naatey
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
मुखडा
वेगळ्या वाटा निराळे आपले आभाळही
का तुझ्यामाझ्यात विणतो बंध हळवे काळही
कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे…
अंतरा १
लाख शंका या मनाशी प्रश्न होती भोवरे
का तुझ्या डोळ्यात माझी शोधते मी उत्तरे
वाटते आहे निराळे माझे मला हे वागणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे
अंतरा २
हा तुझा आहे लळा की सोबतीची आस ही
काय देऊ नेमके या भावनेला नाव मी
या मनाचे त्या मनापाशी उगा रेंगाळणे
कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे
का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे