आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी – Aale Janu Indradhanu Papnyat Datuni
आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी सभोवती नसे कुणी लाजते मलाच मी
नवखे वाटते सारे ते तसेच जरी लागते कसली हुरहुर गोड ऊरी माझी मला अनोळखी भासते उगाचमी कुणीतरी आज अशी अोढ नवी लावूनी भुलवते पुन्हापुन्हा हासते उगाच मी
पाकळी पाकळी उमलुनी आली अशी नकळे मन हे आवरुन घेउ कशी माझे माझे नवे काही सांगते मलाच मी नकळत जाई असे देहभान रंगुनी सभोवती नसे कुणी लाजते मलाच मी