Aarti Prabhu Award 27 March 2022
आरती प्रभू पुरस्कार २०२२!!!
गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, समईच्या शुभ्र कळ्या, ये रे घना ये रे घना, लवलव करी पातं, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.. आरती प्रभू यांच्या गाण्यातली रूपकात्मकता अन् सोप्या शब्दांमध्ये दडलेला गहन गूढ आशय माझ्या नकळत्या वयापासून मला भुरळ घालत आला पुढे गीतकार झाल्यानंतर ते गारुड अधिकच गडद झालं. . नाटककार ,कादंबरीकार, कवी, गीतकार अशी चौफेर मुशाफिरी करणाऱ्या आरती प्रभू म्हणजेच चिं त्र्यं खानोलकर यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या जन्मगावी ते ज्या शाळेत शिकले तिथेच देण्याची आरती प्रभू फाऊंडेशन आणि बाबा वर्दम थिएटरची संकल्पना ही अतिशय हृद्य . माझ्या कोकणच्या मातीत प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक दीपक करंजीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आरती प्रभू यांच्या कवितेतून निथळणारा गहिवर मनात दाटून आला. संध्याकाळ अतिशय अविस्मरणीय झाली. संबंधितांचे आणि उपस्थित रसिकांचे मनःपूर्वक आभार.
छान बातमी. मनःपूर्वक अभिनंदन! ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय त्यांच्यासारखंच विविध प्रकारचं लिखाण तुमच्याकडून सातत्याने घडो, ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचो आणि त्या कामाचा सर्व स्तरांवर गौरव होवो हीच सदिच्छा!