(मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते) – 2
(मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते) – 2
मन उधाण वाऱ्याचे……
तनाना तनाना तनाना….
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान फिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते
सावरते बावरते झाडते अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होवून पाण्यावरती फिरते
आन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
(मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते) – 2
मन उधाण वाऱ्याचे……
रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासांच्या मागुनी पळते
(मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते) – 2
मन उधाण वाऱ्याचे……
(मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर, देवा देवा मी जातो दुरून) – 2
ओढह लावती अशी जीवली गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
(मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा, देवा मी जातो दुरून) – 2
ओ हो हो हो हो ……………….
गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी
हा गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वालाखला दुरून
मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून
(मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हायतर देवा , देवा मी जातो दुरून ) – 2
उध उध उध उध उध उध ………..