Agatik

अगतिक

दाटल्या आभाळाची अगतिकता
डोळ्यात थोपवून धरत
भेगाळलेल्या भुईच्या कुशीत
आशा पेरणारा तो
लेकरांच्या तोंडात घास पडावा
म्हणून आभाळाची करुणा भाकणारा तो
भाबडा निरागस पिचून गेलेला
तरीही आशावादी

मग आम्ही म्हनायचो
नको भिऊ भावा हौत आमी तुझ्या पाठीशी
तू तिथं खचलेला आमी हितं पिचलेले
आमचं बी काय फार जोमात
नाही चाल्लंय पन
तुझे हाल पाहून काळीज हाल्लंय
नाहि पहावत तुझा त्रास
देऊ आमच्यातला अर्धा घास

पन काल अचानक पाहिला
त्यालाच टिव्हीवर
शेकडो लिटर दुधाची नासाडी
करताना हजारो टन भाजीपाला
पायदळी तुडवताना
अरवाच्च ऊद्दाम भाषेत बोलताना
मिळेल त्याची वाहनं पेटवून देताना
तेवा विश्वास बसेना डोळ्यावर
हा तोच आहे

वाटलं हा आता झाला की
समर्थ याला नाही आमची गरज
आमीच राहिलो पिचल्या कण्याने
जागोजाग ट़याक्स हाप्ते नी टोल भरत
मन मुकाट पहात राहिलं
आतल्या आत खात राहिलं
मग अचानक ध्यानात आलं
ह्ये तर हितलंच वारं तिथं गेलंय
कळपात शिरलेल्या लांडग्यानी
कोकरांच्या नावानं राजकारन क्येलंय!

– गुरू ठाकूर

1 reply
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    क्या बात गुरू ! किती संवेदनशीलता ही !
    आम्ही फक्त बघतो ऐकतो ….. असं तुझ्यासारखं व्यक्त होणं , मांडणं नाही येत आम्हाला …..
    तुझा प्रिझम कधी तरी देशील? अनुभूती नाही पण अनुभव तर घेता येईल ….

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*