Anubhooti
अनुभूती…
“जिथे रुजावंसं वाटलं तिथे नेमकी वाळू होती…अलिप्त, स्वमग्न. तिने मुळांशी जवळीक केली पण सलोखा नाही. ती तिच्या मर्यादांशी प्रामाणिक राहिली. साहजिकच कोंब करपला …खळखळ निवली. डोहात पुन्हा शांतता… गूढ, गंभीर…”
हे होणे लिखितच होते ..
हे असं?? ते तरी का?
केवळ तुला त्या अनुभवापासून वंचित ठेवायचं नव्हता नियतीला… पण तुझ्या पदरी हळवी माती असती तर रुजला असतास, फोफावला असतास; मग तुझ्या कार्याचं काय? म्हणून ही रचना वरूनच केलेली आहे…
हे सारं ठरवून केलेलं आहे?
अर्थात!! जो जगलास तो क्षण सोड ..गेला त्याचं दु:ख करू नको. केवळ तो परिपूर्ण होता की नाही हे तपासून पाहा ..अर्धवट सुटलेल्या आशाळभूत क्षणांची पिशाच्चं वाईट. सोललेल्याचा व्रण राहतो; पण सुटलेल्याची खूण ही राहत नाही ..आणि जे परिपूर्ण असतं ते सहज सुटतं, मुक्त होतं. मुक्त झाल्याखेरीज वैराग्याच्या विवरात विहार करता येत नाही .. जे अपुरं राहतं त्याचे खुंट पुढच्या प्रवासात अडसर ठरतात; ते विरावेत, पुढचा प्रवास निखळ व्हावा म्हणून ही रचना!
बापरे, हे कुठवर सुरू राहतं??
आयुष्याच्या समिधा सरेपर्यंत हा होम सुरूच राहतो ..
पण मग ज्या मार्गापासून मुळातच अलिप्त राहायचं ठरवलं , त्यावर जाणूनबुजून सोडण्याचं कारण? उगाच खोडसाळपणा काहीतरी… विनाकारणच..
नाही. इथे विनाकारण काहीही नसतं, प्रत्येक घटनेला कार्यकारण भाव असतो, तो उलगडावा लागतो. त्याकरता साधना लागते. साधना हवी; तर समाधी लागावी लागते आणि समाधीकरता सम आधी गाठावी लागते. साहजिकच त्याकरता वेळ द्यावा लागतो; तेवढा वेळ नसतो प्रवाहात वाहणाऱ्यांकडे! ते सहज हाती लागलेला गैरसमजाचा अोंडका धरून वाहत राहतात. साधकाला ही मुभा नाही. त्याची कोणतीही कृती अन् विधान गैरसमजातून आलेलं नसावं, त्यामागे अनुभूतीची बैठक असावी म्हणून हा प्रपंच. कुणी भाजलं म्हणाला; तर नेमकं काय झालं, याची जाणीव असावी, त्याचा दाह नेमका कळावा म्हणून एक चटका. वेदना अोळखीची असेल तर विव्हळणाऱ्याचा टाहो सखोल वाचता येतो. तसंच आहे हे पण..आता यापुढे गुंतल्या गात्रांची गाज तुझ्यापर्यंत पोचेल. विरह, व्याकुळांची अगतिकता, त्यांच्या डोळ्यात वाचू शकशील..कसब कमावण्याकरता काहीतरी पणाला लावावंच लागतं.. यापुढे आघात किती मोठा याने व्यथित होण्यापेक्षा, नाद किती दीर्घ याचा आनंद घे..जगणं सोपं होईल..
ठण्ण् …घंटेच्या नादाने तो भानावर आला… त्या जीर्ण मंदिराच्या खांबाशी बसल्या बसल्या त्याचा डोळा लागला असावा… उजाडायला अजून अवकाश असावा… घंटा कुणी वाजवली? तो उठून दीपमाळेशी आला. खाली गाव अद्याप साखरझोपेतच होतं. दारातल्या देवचाफ्याचा दरवळ दीर्घ श्वासात भरून घेत त्याने टेकडी उतरायला सुरुवात केली.
-गुरू ठाकूर
This felt so much like automatic writing or psychography. Serene.
यापुढे आघात किती मोठा याने व्यथित होण्यापेक्षा, नाद किती दीर्घ याचा आनंद घे….जगणं सोपं होईल
तुमच्या लिखाणातला हा असा दृष्टिकोन त्याला उजवं करतो…ह्या शब्दांनी ताकद दिली….धन्यवाद _/\_
सोसलेल्याचा व्रण राहतो पण सुटलेल्याची खुणही राहत नाही हे अनुभवल्याशिवाय कळत नाही .
परिपूर्णता म्हणजे पाशमुक्ती!
खरंय वेदनेचा चटका स्वतः अनुभवल्या शिवाय विव्हळणाऱ्याचा टाहो कसा कळेल?!
घंटेचा नाद, जीर्ण मंदिर ,दीपमाळ नेमकं कशाचं प्रतीक असावं? आणि तो भानावर येऊन उतरणीच्या वाटेला लागला म्हणजे निर्वाणीचा उतार होता का तो ?!
मी आधी एकदा हे वाचून प्रतिक्रिया दिली होती परंतु आज पुन्हा वाचलं ….. आणि प्रतिक्रिया द्यावीशी वाटली.
हा संवाद नेमका काय आणि कुणाशी ? तटस्थ पणे केलेला स्वतः च्या बुद्धीशी? ……हीच …. ती अनुभूती!
same here…
mi hi tyanchya post punha punha vachat aste, tyatun mala dar veli ajun gahan arth sapadto…. bahutek hich ti anubhuti asavi…
karan kahi vela kahi post mi fakt vachte pan tya mala titkyashya samjat nahit kinva patat nahit.. pan ajun kahi divsanani mi tya post parat vachlya ki mala tyatla arth samjat jato… tya darmyanchya kalat kadachit tase anubhav aalyane mala ti post nantar nit samajte…
ani varil sanvad pratyekanech swatashi kadhi na kadhi tari kelela asava kinva karat asava…
ekhadya kathin paristhititun jatana “dar veli mich ka?” ha prashna pratyekalach padto..bahuda tyatunach varcha sanvad jhala asava….kathin paristhitit jenvha apan devacha, bhagvantacha dhava karto tenvha aaplya aat asnarya devane mhanje sadvivek buddhine aplyala dakhavlela ha marg asava…. ase majhe mat aahe.
khartar, hya blog var tumchya prashnala guru siranni uttar den apekshit aahe, pan mala rahavle nahi mhamun mi hi majh mat mandale… so, please tumchya doghankadunhi rag nasava…
सर,हा लेख सध्या माझ्याकरिता खुप उपयोगी पडतोय मी ह्याच अवस्थेतून जात आहे.तुम्ही जेवढं लिखाण करता मग ते गीत असो वा आणखी काही ते मला नकळत आधार देवून जाते.नाहीतरी मी मनातून अक्षरशः कोसळून जातो.मीही छोटं मोठं लिहीतो.कादंबरी ही लिहायचं धाडस केलय.काव्य तर माझ्या आवडीचा विषय…आपली भेट व्हावी ही इच्छा आहे माझी…
wah kiti surekh lihil aahes … samadhi karita sm aadhi gathavi…. jeevnach sangeet jyala kalal toch khara manus teech khari jagnyachi anubhuti.
नमस्ते सर
या ब्लॉग वरील कविता खुप छान असतात
मनातील भावना शब्दांच्या रूपात तुम्हीं मांडता
केव्हा तरी मी पण असा प्रयत्न करतो चांगला आहे का नाही कल्पना नाही पण तुमच्या सोबत शेयर करेन तुमचा प्रतिसाद महत्वाचा आहे
1-आज स्वत:च्या चेहर्याला पन शांतपणे निरखुन पाहील….
समजल धावपळीच्या जगात आता पहिल्यासारखा नाही राहील….
जबाबदारी अन समाजवादाच ओझा ज़रा जास्तच दिसल……..
आठवाव लागता कि केव्हा आपल मन मोकळेपणाने हसल…….
आरश्यात आपण पाहतो दुसर्याला चांगला दिसण्यासाठी…..
कोणी तरी आपल्याकडे सतत पाहात रहाव यासाठी…
जिवनाच्या या प्रवासात स्वतासाठी जगायचाच राहील……
अन अाज वेळ मिळाला म्हणुन स्वत:च्या चेहर्याला शांतपने निरखुन पाहीला…..🙂🙂
2-ज़िंदगी का हर लम्हा तुझे सिखाएगा….
कभी दुख के तो कभी सुख के आँसू ये रूलाएगा….
जो दिल से चाहेगा मेहेनत से उसे पाएगा…..
जो आज नहीं तेरे पास वो कल गले लगाएगा…..
आख़िर में मेहनत ही तेरी रंग लाएगी….
दिल में कभी खोट ना रख ……
से दुनिया तेरे आगे सर झुकाएगी……
धन्यवाद…
शेवटून दुसऱ्या परिच्छेदातच याचं उत्तर सापडतं. कृती अन् विधानाची सम.
सर, “सम”चा इथे नेमका कोणता अर्थ अपेक्षित आहे??
विनाकारण काहीही नसते, त्याला कार्यकारणभाव असतो, हे अगदी मान्य..
पण एखादा क्षण परिपूर्ण आहे की नाही, हे आपण कस काय तपासू शकतो?? तो क्षण जगणारे ही आपण अणि तपासणारे ही आपणच…काही गोष्टी आपण स्वानुभवाने तपासू शकतो पण नव्याने उद्भवलेल्या कठीण परिस्थितीतीला कस तपासावे..