Anuwaad
अनुवाद
रात्रभर खिडकीबाहेर दिसणारा
चंद्राचा चतकोर चघळीत
तो सुन्न बसून होता
त्या सैरभैर मन:स्थितीत
त्याने आठवणींचा
आसवांत केलेला अनुवाद
कागदभर विखुरला होता…
जो पहाट किरणानी स्वाहा केला.
एक काव्य जगाला अज्ञातच राहून गेलं.
गुरु ठाकूर
रात्रभर खिडकीबाहेर दिसणारा
चंद्राचा चतकोर चघळीत
तो सुन्न बसून होता
त्या सैरभैर मन:स्थितीत
त्याने आठवणींचा
आसवांत केलेला अनुवाद
कागदभर विखुरला होता…
जो पहाट किरणानी स्वाहा केला.
एक काव्य जगाला अज्ञातच राहून गेलं.
गुरु ठाकूर
Hey jyane anubhvlay na that person will surely be touched on reading this. It is beautiful. Memories, the deluge that memories are. Heartbreaking some. Heartwarming some. Clawing on to the heart and the soul.
Short sweet crisp कमीत कमी शब्दात एक कथाच संगितलीस तू …..
आई ग…?सुंदर सर..?