Apsara Aali
अप्सरा आली..
नटरंग चित्रपटातल अप्सरा आली प्रचंड लोकप्रिय झालं.. त्या नंतर मला अनेकानी अनेकवेळा विचारलं अप्सरा आली हे एका सौदर्यवतीचे वर्णन असले तरी लिहीताना तुमच्या नजरे समोर नेमकं कोण होतं? खरं सांगायचं तर स्वत: लावणीच. कथेच्या गरजे नुसार इथे जी लावणी असणार होती ती त्या गुणा कागलकराच्या फडाला मिळालेलं यश दाखवणारी त्या यशा मागुन आलेली श्रीमंती एकुणच सर्वत्र दिसणार होती त्या फडाच्या तंबू पासुन फडक-यांच्या वेषभूषेपर्यंत ही श्रीमंती दिसावी म्हणजे प्रेक्षकांना तो बदल लक्षात येईल असं ठरलं.या करताच लावणी लिहीताना मी विचार केला मग ती श्रीमंती शब्दात का नको? साधा हौशी शाहिर असलेल्या गुणाला जर लोकप्रीय शाहीर म्हणून मानाचं कडं आणि जरी पटका तमाशा परीषदेत मिळतो असं दाखवलंय तर मग त्याच्या लेखणीतुन अन भाषेतुन ती प्रगल्भता तो अभ्यास दिसायला हवा त्याला पंडीती काव्याचा वास हवा.भाषेतल्या त्या नजाकती करता मी शोध घेउ लागलो अन जे गवसलं त्याने थक्कच झालो..या साहित्य प्रकाराचा सखोल अभ्यास करताना तीनं मला इतकी भुरळ घातली की मला ती जणू एखाद्या अप्सरे सारखी वाटू लागली.. एखाद्या शाहिराच्या नजरेने तीच्या कडे पहाताना जाणवले की.. लावण्यवती लावणी ही साहित्यप्रकारातली अप्सराच आहे जणू कोमल काया की मोहमाया? खरंच तीने भल्याभल्याना भुरळ घातलीय. रंगेल रसिकांची बात सोडा अगदी शब्दप्रभू पंडीत विद्वान अगदी संत कवींनाही. तिची अदा,तिची नजाकत, तिच्या सौदर्यांच्या छटा पाहिल्या अन जाणवलं की ही नुसतीच लावण्यवती नाही तर शृंगार रसात नटुन थटुन जणू ती एखाद्या अप्सरे सारखी पृथ्वीतलावर उमटली आहे.आणि कस्तुरी सारखी मनमनात दरवळते आहे .हे मनात आलं अन मग तिचं किती वर्णन करु अन किती नको असं होऊन गेलं.शब्द नेमक्या नजाकतीसह अलगद कागदा वर उतरले.
कोमल काया की मोहमाया पुनव चांदन न्हाली
सोन्यात सजली रुप्यात भिजली रत्नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जणू उमटली चांदणी रंग महाली
ही यौवन बिजली पाहून थिजली इंद्र्सभा भवताली
अप्सरा आली..
छबीदार सुरत देखनी जनू हिरकनी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी नयन तलवार
ही रती मद भरली दाजी ठिनगी शिणगाराची
कस्तूरी दरवळली दाजी झुळुक ही वा-याची
ही नटली थटली जणू उमटली चांदणी रंग महाली
ही यौवन बिजली पाहून थिजली इंद्र्सभा भवताली
अप्सरा आली..
लावणी असली तरी एखाद्या आध्यात्मिक काव्या प्रमाणे भारुडा प्रमाणे तिच्यात एकाच वेळी हे दोन अर्थ रुपकात्मक रित्या मांड्ता आले.म्हणून हे काव्य मला वेगळं समाधान ही देउन गेलं. थोडक्यात काय तर यातली ’अप्सरा” म्हणजे स्वतः लावणीच.!!!!
Guru
माझ नाव अनिल देसाई, आता वय ७७ म्हणून देसाई गुरुजी . मी तरूण, विशेषतः गरीब मुलांना motivational मार्गदर्शन करतो . त्यासाठी मला काही गीत लिहून पाहिजे आहेत. तुझ्या सारखा गीतकार मिळाला तर माझ नशीबच.. कृपया मला contact कर मग भेटून सविस्तर बोलता येईल. मी बोरीवली इस्ट मध्ये शांतिवन मध्ये पुष्टिपती गणपती जवळ राहतो माझा मोबाईल 8879436410 Email id is adesai@ucf.edu
नमस्कार अनिल गुरूजी. आपण मुंबईमधल्या तरूण गरीब मुलांना मार्गदर्शन करता. छान उपक्रम आणि सामाजिक कार्य करता. खूप शुभेच्छा.
गुरू ठाकूर यांची “असे जगावे” हि कविता तुम्ही वाचली आहे का? ती मला खूप प्रेरणादायी वाटते. तुम्हालाही नक्कीच आवडेल. हि कविता का नाही वापरत?
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या शालेय अभ्यासक्रमात, इयत्ता सातवीच्या पुस्तकात ह्या त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आलाय. तुमच्यासाठी खाली लिंक देत आहे.
https://www.guruthakur.in/ase-jagave-2/
– गिरीश
गिरीश नमस्कार
असे जगावे खूप चांगली आहे . तुम्ही वेळात वेळ काढून हे सांगितल्याबद्दल धन्यवाद
— देसाई जुरुजी