Ase Jagave

असे जगावे

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भिती आंधळी ता-यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमीनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावुनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

-गुरू ठाकूर

8 replies
 1. सागर
  सागर says:

  ही कविता गुरू ठाकूर यांची नसून विं.दा.करंदीकर यांची आहे. कृपया नोंद घ्यावी आणि योग्य ते बदल करावे

  Reply
  • admin_GT
   admin_GT says:

   प्रिय श्री. सागर,

   कृपया खालील गोष्टींची नोंद घ्यावी.

   महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमात, इयत्ता सातवीच्या पुस्तकात, ह्या गुरू ठाकूर यांच्या कवितेचा २०१७ साली समावेश करण्यात आलेला आहे.
   https://www.guruthakur.in/ase-jagave-in-m-s-b-7th-std-syllabus/

   दैनिकाच्या कात्रणात दिल्याप्रमाणे, विंदांच्या साहित्याचे प्रकाशक पॉप्युलर प्रकाशनच्या संपादकीय विभागाने ही कविता विंदांच्या कुठल्याही काव्यसंग्रहात नाही असे स्पष्ट केले आहे.
   https://www.guruthakur.in/gurus-poem-on-vinda-karandikars-name/

   – गिरीश

   Reply
 2. Sagar Muranjan
  Sagar Muranjan says:

  jenwha jenwha hi kawita wachto na khup bharawun jato… tuzya shabdat jadu aahe Guru… khup positive watata , God bless you for this wonderful creation….

  Reply

Trackbacks & Pingbacks

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*