Ase Jagave – in M.S.B. 7th std. Syllabus
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या शालेय अभ्यासक्रमात, इयत्ता सातवीच्या पुस्तकात “असे जगावे” ह्या माझ्या कवितेचा समावेश करण्यात आलाय. गीतांतून पोहोचण्यापेक्षा नव्या पिढीकडे त्यांच्या अभ्यासक्रमातून पोहोचता आल्याचा आनंद वेगळा आहे, हा माझ्याकरता नक्कीच खास पुरस्कार. माझ्या शब्दांचा असा सन्मान करणाऱ्या शिक्षण समितीचा आभारी आहे.
-गुरू ठाकूर
Ase Jagave – in Maharashtra State Board’s 7th Standard’s Syllabus
Beacuse it deserve . Most motivative & outstanding words . So congratulation a lots .
नमस्कार दादा,
अभिनंदन दादा.
मी तुमच्या कविता,गाणी वाचत आहे वाचत होतो.मनाला भिडणार लिखाण मला आवडतं. अनं तुमचं लिखाण मला प्रेरणा देत लिहिण्यास.
मी लिहितो आहे.प्रयत्न करतो आहे.जे वास्तव पाहतोय ते मांडतो आहे.तुमच्या कडून मला काही प्रतिक्रिया मिळाल्या कि चुका वैगेरे तर मला सुधारण्यास मदत होईल.
http://swapnilview.blogspot.com
चुरगळलेल्या कागदाला पुन्हा सरळ करण्याचा माझा अयशस्वी प्रयत्न,
ते करताना जाणवलं त्या कागदाने सोडून दिलं होतं त्याच स्वत्व,
आता तो इतका स्वतःला विसरला होता की त्याचं खरं रूप त्याला किती ही प्रयत्नतांती मिळत न्हवतं,
तरीही मी प्रयत्न सोडले नाहीत सरळ करत बसलो त्याला पडलेल्या घड्या,
माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा अनं घड्यांचं जीर्ण होणं सोबतच,
आणी जीर्ण झालेल्या घड्या झाल्या एकमेकांपासून दूर,
कागदाचा चुरगळलेल्या अवस्थेतून जीर्ण होण्या पर्यंत आणी नंतर विभक्त होई पर्यंत मी प्रवास अनुभवला,
दुरावलेल्या नात्यांचं पण असचं असतं ना?कागदासारखं “चुरगळलेल्या”.
के स्वप्नील