Ase Jagave
असे जगावे
‘कधी शब्द आले सुरांनीच न्हाले
मलाही न कळले कसे गीत झाले’
मला गाणी कशी सुचतात या प्रश्नाचं उत्तर मी अनेकदा या शब्दांत देतो. माझ्या काही गाण्यांनी भरभरुन आनंदासोबत मानसिक आधार, प्रेरणा, जगण्याला दिशा दिली अशा आशयाच्या प्रतिक्रिया रसिक श्रोत्यांनी पत्र, ई-मेल्स, फोनच्या माध्यमातुन तसंच प्रत्यक्षात भेटुनही दिल्या. अनेकांना त्यातल्या ओळी वाचताना मी philosopher प्रमाणे तर कित्येकाना psychatrist प्रमाणे वाटलो काहींनी यातल्या ओळी शब्द सुविचाराप्रमाणे लिहुन भिंतीवर लावले. या प्रतिक्रिया मलाही थक्क करणा-या होत्या. त्यातलीच काही निवडक गाणी..जगण्याकडे पहायची सकारात्मक नजर देणारी.!
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची भिती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
-गुरु ठाकूर.
खरोखरच खूपच सुंदर कविता! मी ही कविता किती वेळ ऐकली किंवा वाचली मी काऊंट विसरलेय … पुन्हा पुन्हा वाचताना आणि ऐकताना ती तितकीच गोड आणि प्रेरणादायी वाटते.
या कवितेतील नेमकं कुठलं कडवं जास्त आवडलं असं विचारलं तर मला सांगता येणार नाही कारण entire कवितांचं सौंदर्याने नटलेली!
मराठीच्या पाठ्य पुस्तकात आता जिचा समावेश आहे , खरच उर आनंदांभिमानाने भरून आला. I wish god should grant me the wish to teach this poem to my students…
Guru Russian great ho….