Avchitaa Parimalu
अवचिता परिमळू “तुझ्या एकटेपणातून दु:खातून तुला मोकळं करणारा उदयीक सोनकिरणात न्हात येइल..पदरात सुख नांदेल..” पहाटेचं स्वप्नं कानात घोळवत अन डोळ्यात खेळवतच ती उठली. स्नानादिक आटपून छान नवी वस्त्र लेऊन लगबगीनं त्या अनाहुताच्या स्वागताला सज्ज झाली. श्वेत अश्वावर आरूढ होउन येणाऱ्या राजकुमाराच्या कथा तिने बालपणात पेंगुळल्या डोळ्यानी तिच्या आजीच्या तोंडून ऐकल्या होत्या. आज तोच तिच्या स्वप्नळल्या डोळ्यात तरळत […]