Entries by Guru Thakur

Talaash

तलाश (Talaash) चाय से इसकदर ताल्लुक न था पहले मगर, उस रोज वोह चाय की मिठास जो तेरे लबोंसे चुराई थी ढुंडते रहता हुं चायकी हर प्याली में. तलाश अबभी जारी है… लोग कहते हैं इसे चाय पीनेकी बिमारी है – गुरु ठाकूर

Shravan

श्रावण (Shravan) सुख वेचिन म्हणण्या आधी घन दुःखाचा गहिवरतो अन दुःख सावरू जाता कवडसा सुखाचा येतो या ऊन सावली संगे रमण्यात ही मौज म्हणूनी मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो – गुरू ठाकूर

MaTa Video Entertainment 18th July 2018-on Guru Thakur’s Birthday

विविध कलांचा ‘गुरू’ ठाकूर महाराष्ट्र टाइम्स – Jul 18, 2018, 06:37 PM IST मराठी सिनेरसिकांना गुरू ठाकूर याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. गीतकार, पटकथा, संवादलेखक, अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकांतून तो चाहत्यांना भेटत असतो……… (खालील चित्रावर क्लिक करा)

Kase Geet Zale – 6th July 2018 at 8:30pm, Dinanath Natyagruh, Vile Parle

माझ्या गाण्यांना दाद देताना तूमचा एक प्रश्न कायम असतो “कसं सुचलं हे?”. याच प्रश्नाचं उत्तर साग्रसंगीत सांगण्याकरता ही मैफल .”कसे गीत झाले” गाण्यांच्या जन्मकथा सोबत कविता आणि तुम्ही भरभरुन दाद दिलेली गाणी . तारीख ६जुलै रात्री ८।३० वाजता, स्थळ दिनानाथ नाट्यगृह,विलेपार्ले. तुम्ही येताय ना?

Hunger

Hunger (Click here for Original Marathi version) Hunger… It is perhaps the singular instinct that animals are born with. Their first cry at birth is but a plea to satisfy this need. But what about us humans? It’s probably the same, but human hunger is insatiable and often all-consuming. How so? At birth, the instinct […]

Anubhooti

अनुभूती… “जिथे रुजावंसं वाटलं तिथे नेमकी वाळू होती…अलिप्त, स्वमग्न. तिने मुळांशी जवळीक केली पण सलोखा नाही. ती तिच्या मर्यादांशी प्रामाणिक राहिली. साहजिकच कोंब करपला …खळखळ निवली. डोहात पुन्हा शांतता… गूढ, गंभीर…” हे होणे लिखितच होते .. हे असं?? ते तरी का? केवळ तुला त्या अनुभवापासून वंचित ठेवायचं नव्हता नियतीला… पण तुझ्या पदरी हळवी माती असती […]

Varkha

वर्ख आधुनिकतेच्या नावाखाली समाजावरला संस्कृतीचा वर्ख अनावश्यक जोखड म्हणून त्वेषानं खरवडून काढू पहाणाऱ्यांना हे माहितच नसावं का? की ज्या क्षणी तो वर्ख निघेल त्या क्षणी मोकळं होईल अदिम काळापासून केवळ संस्कृतीच्या बंधनात गुरफटून राहिलेलं श्वापद? फांद्या छाटण्या आधी पाळंमुळं कळावी लागतात असं म्हणतात ते उगाच नाही…. -गुरु ठाकूर

Redu – Devak Kalji Re – Lyrics by Guru Thakur

‘फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपान गाठीला धरतं वेठीला कशीरे सुटावी आशा… देवाक काळजी रे’ काही गाणी लिहिताना जगणं उतरतं कागदावर.नक्की पहा. (रेडू चित्रपटातील गुरू ठाकूर ने लिहिलेल्या गाण्यांच्या शब्दांसाठी इथे क्लिक करा) Soulful devotional Marathi song 2018 “देवाक काळजी रे” sung by reknown singer Ajay Gogavale from upcoming Marathi Movie Redu starring […]

Techno Worry

Techno Worry आजच्या टेक्नोसॅवी युगात जन्माला आलेली “स्मार्ट” पिढी कधी काळी डोळे मिटून बालपणात शिरेल तेव्हा भरवणाऱ्या हातामागच्या चेहऱ्याऐवजी मोबाईल स्क्रीन नाहितर कार्टून चॅनेलवरले चित्र विचित्र चेहरे अन संदर्भहीन बडबड आठवून हळवी होईल का तशीच? जसे आम्ही होतो हा काउचा हा चिऊचा हा हम्माचा हा मनीचा म्हणून भरवणारा मायेने अोथंबलेला चेहरा आठवून… -गुरु ठाकूर