Entries by Guru Thakur

Pustakdinachya Manpurvak Shubhechcha

पुस्तकदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! घरातल्या बंद कपाटात मोकळ्या शेल्फवर पलंगाखाली नाहींतर अडगळीच्या कोपऱ्यात जिथे सापडेल तिथून उचला तुमच्या स्पर्शासाठी आसुसलेलं एक पुस्तक अगदी तुम्ही पूर्वी वाचलेलं का असेना धूळ झटकून उघडा शक्य तितके वाचा निराश नाही करणार ते काहीतरी नवे सापडेल किंवा जुनेच नव्याने उमगेल मग मिटून ठेवताना दुमडा एखादा कोपरा खुणेचा म्हणून नाही दुखावणार ते […]

Breaking News

ब्रेकिंग न्यूज फुंकर दु:खावर घालता येते अन उ्द्रेकाच्या ठिणगीवरही ते ठिणगीच निवडतात कारण ठिणगीचा वणवा होतो तो विकता येतो वृत्त म्हणून वणव्याच्या होरपळीतून नवी दु:खं जन्माला येतात त्यांच्यावर घातलेली फुंकर विकली जाते त्याहून अधीक मोलाने त्यांना जमलंय आता तंत्र त्यांना माहित आहे मंत्र इथे जो विकणार तोच टिकणार आता प्रश्न एकच यातून नेमकं काय घ्यायचं […]

Shabda Kodi

शब्दकोडी शब्दकोड्यासारखी असतात काही माणसं तुकड्या तुकड्यांत दिसणारी काळ्यापांढऱ्या चौकोनात अगदी काटेकोर बसणारी आपण रित्या रकान्यांत उगाच फिरत रहातो कळतील तसे अर्थ लावून नेमके शब्द भरत रहातो पण जेव्हा उभा रकाना आडव्याशी जुळत नाही याच अर्थाचा नेमका शब्द काही केल्या मिळत नाही तेव्हा होतो तिढा तिथे आणि घट्ट बसते गाठ बघता बघता जीव काढतात उभे […]

Pinjaraa

पिंजरा… फुगत चाल्लंय आता शहर पळतापळता घालतंय धाप भिजत नाही रुजत नाही सुजत चाल्लंय वारे माप चाळीमधल्या बिऱ्हाडातून गगनचुंबी खुराड्यातून पक्षी भिन्न, भाव तोच ठुसठुसणारा घाव तोच पिंजऱ्याआड फडफडताना स्वप्नामधला गाव तोच आभाळाचा निळा तुकडा खिडकीमधून देतो साद तहान, भूक, सूख मिळून हळवा कोपरा करतात बाद कोंडत जातो इथे श्वास सोडवत नाही तरी कास घुसमट […]

Rutuheen

ऋतुहीन शहराला हळवं करत नाही चैत्र पालवी, शहराला होत नाही कधीच हिरवी रंगबाधा, शहराच्या पाठीवर उमटत नाही ऋतूंची लिपी… अन् चैत्र चाहुलींने कंठ फुटल्या पाखराचं गाणं, पोहोचतच नाही शहराच्या डेसीबल झोकून बधीरलेल्या कानात!! फुटलेच इथल्या निबर भिंतींना लालुस पोपटी डोळे, तर ते फोडले जातात व्यावहारिक शहाणपणाने. सिमेंटच्या कातड्याखाली दबलेल्या मातीचा  दरवळ मातीखालीच विरुन जातो …! म्हणून […]

Shraaddh

श्राद्ध आयुष्य खर्ची घालून लिलावात घेतलेली काही स्वप्न सापडली त्याच्या सातबाऱ्यावर केवळ, तेव्हा जमलेले सारे वारस नाहिसे झाले पिंड टाळणाऱ्या कावळ्यांसारखे – गुरु ठाकूर

Kubadi

कुबडी ‘ वेद वाचणाऱ्या पेक्षा वेदना वाचणारा ऋषितुल्य असतो. संवेदना कमालीच्या जागरुक लागतात त्या करता..तुला वेद येत नाहीत पण वेदना वाचता येतात हे अंग दुर्मिळ आहे जप’ कळत्या वयात त्याला कुणी तरी जाणतेपणानं म्हणालं होतं. “जपून काय करू ? समोरच्याची तहान कळते अन आपली कावड रिकामी आहे हे जाणवतं तेव्हा जो क्लेश होतो त्याचं काय […]

Vyatha

व्यथा नात्याच्या पात्याला अपेक्षांची मुठ शिवलेले ओठ जाणिवेचे खेदाच्या खुंटीला टांगलेले पाप सोसवेना धाप कर्तव्याची स्वार्थाच्या भिंतीत विरक्तिचा खिळा अहिल्येची शिळा जन्म सारा – गुरु ठाकूर

Rangankit

रंगांकित भेटीलागी आले। रंगांचे सोयरे। म्हणती कायरे। रंग तुझा।। वदलो बा माझी । पाण्याचीच जात। भेटल्या रंगात। मिसळतो।। हरखले सारे। झाली गळाभेट। गेला रंगभेद। विरोनिया।। जाहलो त्या क्षणी। साऱ्यांचा सोयरा। रंगी रंग सारा । एक झाला।। – गुरु ठाकूर

Paperweight

पेपरवेट दिवस विझू लागला की मनाच्या सांदीला फडफडू लागतात शरपंजरी पडलेल्या स्वप्नांनी भरलेले दयामरणाचे अर्ज.. अन मग; त्यांच्यावर काही ठेवलं नाही तर ते ऊडून घरभर होतील याची भिती छळू लगते अशा वेळी कळतं काळजाच्या दगडाचं खरं महत्व… – गुरु ठाकूर