Entries by Guru Thakur

Man Mokla Karayla Ek Tari Jagaa Havi

मन मोकळं करायला एक तरी जागा हवी मन मोकळं करायला एक तरी जागा हवी ती ज्याची त्याने शोधावी सापडलीच तर सोडू नये कारण साचलेल्या विचारांचं तळं जिवघेणं असतं . त्याला तळ नसतो असतो केवळ भोवरा एकदा त्याच्या तावडीत सापडलात की आपल्याला नेमकं काय हवंय हे कळायलाच काळ लोटतो … आणि ते कळतं तेव्हा वेळ निघून […]

Garhane

गाऱ्हाणे कालचे कोवळे आज वाटे जून जाणिवेचे भान रोज नवे . जन्मही कोवळा अंती जून होई विरोनिया जाई काळासवे जाणती जाणीव परी हे न जाणे म्हणोनि गाऱ्हाणे सुरु राही – गुरु ठाकूर

Sobat

सोबत डबडबलेल्या डोळ्यांनी ताटकळावं मोकळं होण्यासाठी पापणी लवण्याची वाट पहात.. अगदी तसंच, खूप दाटून येतं कधी कधी बरंच काही अन मग लिहावंसं वाटतं… साचलेलं सारंच वाहून येतं किती लिहू, काय लिहू होऊन जातं एखाद्या निरव दुपारी… कागद पेन, सारा जामानिमा हजर असतो तरी देखील घुटमळत रहातो लिहिता हात सापडतच नाही नेमकी सुरुवात…! कोरा करकरीत कागद […]

Kallol

कल्लोळ धावते धमन्यांतुनी अस्वस्थ काही सारखे भोवती आधार इतके वाटे तरी का पोरके गोठला अंधार झाले मन भितीचा काजवा सोसवेना शांतता कल्लोळ थोडा वाढवा – गुरु ठाकूर

Bechaini

बेचैनी वैशाख उतरणीला लागला की, वळवाच्या हुली सुरु होत असत.अशा वेळी दिवेलागणीला बाहेर अंधारु लागताच, घरातल्या दिव्याभोवती एखादा पाखा (पाकोळी) भिरभिरत फेर धरे. चुलीशी वेटोळं करुन बसलेलं मांजर मग त्याला मटकावण्याच्या इराद्याने घरभर उड्या  मारीत धावे. तो पाखा  भिंतीवर विसावला की, आजी अलगद त्याला चिमटीत पकडून बाहेर सोडी, हकनाक मांजराच्या तोंडी त्याचा जीव नको जायला इतकाच हेतू. आजोबा […]

Bhook

भूक… (Click here for English version) भूक हि एकमेव भावना प्राणी जन्माला येताना सोबत घेऊन येत असावा. त्यामुळे त्याचा पहिला टाहो हा केवळ भुकेकरता असतो. पण मानवाचं काय? हो मनवाचं तेच पण केवळ एका भुकेमुळे तो इतर कोणत्याही प्राण्या पेक्शा अधीक हिंस्त्र होतो. भुकेमुळै??? तेच तर सांगतोय, मुळात आकलन येई पर्यंत तो देखील कुठल्याही इतर […]

Muke Swapna

मुके स्वप्न नवी लाट देई नवे भोवरेही तळी काय त्यांच्या कुणा नाकळे पळे संपताना जळे जन्मचाळा उरी आस वेडी उगा पाघळे विझू घातलेल्या दिसाच्या उशाला मुके स्वप्न वेडे पुन्हा साकळे – गुरु ठाकूर

Dwidha

द्विधा… मिटल्या डोळ्यांनी मनसोक्त कोसळणारा भादव्यातला पाऊस जडावला कि वातावरणावर विनाकारणच गुढाची वाकळ अंथरली जाते. अशावेळी हि दुपार कि सकाळ कि सांज वेळ?  कशा कशाचाच संदर्भ लागेनासा होतो. सारं धूसर अस्पष्ट त्यात संततधारेचा अव्याहत चालणारा सूर मिसळलाकि मनाला हळवं व्हायला निमित्त मिळतं. अंतरंगाचे कोनाडे धुंडाळत ते भिरभिरत सुटतं उसवलेल्या, ढासळलेल्या भूतकाळात मिसळलेल्या अंधुक आठवणींचे शेंडे शोधून तिथेच रेंगाळण्याचा चाळाहि त्याला […]

Kavitecha Pan with Guru Thakur

गुरू ठाकूर सोबत कवितेचं पान https://youtu.be/WMDY_WgThHo Click here for YouTube link महाराष्ट्राचा लाडका गीतकार; गुरू ठाकूर ह्याचा गीतांमागचा आणि कवितेमागचा प्रवास ऐका या ‘कवितेचं पान’ मध्ये.. संकल्पना, दिग्दर्शन, सूत्रसंचालन: मधुराणी प्रभुलकर Kavitecha Paan – Episode 14 – Guru Thakur

Panthasta

पांथस्थ “ऊठ, रखरखाटाने पोळलेल्या पांथस्थाला सावल्यांची स्वप्न पडणे स्वाभाविक आहे. सावली देणे हा झाडांचा धर्म, तो ते इमाने इतबारे पाळत असते पण म्हणून सावली करता थांबलेल्या पांथस्थाने झाडाशी घरोबा करू नये. जे सावलीत रमतात त्यांचा प्रवास खुंटतो, शिवाय मुक्काम म्हटला की विस्तव आला अन् विस्तव म्हटलं की झळ आली. झाडाला झळ सोसत नाही कारण त्यांच्या […]