Karuya Kalla
करुया कल्ला घेउया पंगा
पुस्तक पाटी खुंटीला टांगा
उठता बसता नसेल आता
अभ्यासाचा सल्ला
भिरकावूनिया साऱ्या चिंता
करूया करूया करूया
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
धमाल फंडे शोधू सा्रे
या अकलेले तोडू तारे
हुल्लड बाजी चिल्लर चाळे
पुन्हा नव्याने सुरु करारे
मिळेल संधी जिथे चकटफू
खुशाल मारु डल्ला..
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
Harawali Pakhare
कुठे कधी हरवले कसे कोण जाणे चोचीतले त्यांच्या गाणे
नभाच्या मनाला पडे घोर आताउखाणे कसे सोडवावे
कसे वागणे हे कळ्यांचे फुलांशी कळेना
कधी वाढले हे दुरावे कळेना,
झुरे बाग आता सुनी सुनी सारी,
का कळेना अशी हरवली पाखरे
ती अवखळ वेडी किलबिल सारी
उगीच मनाला हुरहूर लावी
सांजेला होई जीव हळवा रे
जे झाले गेले विसरुनी सारे
हा वेडा वारा सांगे अरे अंगणी पुन्हा रे
का कळेना अशी हरवली पाखरे