Shiv Jayanti Song
ज्याची कीर्ती कानी येता
अशी फुलून येते छाती
त्याची मर्दुमकी ऐकता
गहिवरते माय मराठी
ज्याचे ओठांवरती नाव उमटता होतो ताठ कणा
तो राजा होता रयतेचा ज्याने दिला मराठी बाणा
जय जय जय शिवराय म्हणा
ज्याचे निशाण मिरवत राही
त्यागाचा भगवा रंग
त्या शिवतेजाची अवघ्या
इतिहासाला चढते झिंग
त्या पराक्रमाची गाथा आम्हीं गाऊ पुन्हापुन्हा
तो राजा होता रयतेचा ज्याने दिला मराठी बाणा
जय जय जय शिवराय म्हणा