www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

Bagh Ughdun Daar

Subhedaar He Sarjerao Powada

Dil Maza Wanly Tula Re

Bagh Ughdun Daar

शोधुन शिणला जीव अता रे साद तुला ही पोचल का
दारो दारी हुडकलं भारी थांग तुझा कदी लागल का
शाममुरारी कुंजविहारी तो शिरीहारी भेटल का?
वाट मला त्या गाभा-याची आज मला कुनी दावल का
कोरस –
बघ उघडुन दार अंतरंगातला देव गावल का…
तान्ह्या बाळाच्या हासे रं डोळ्यात तो
नाचे रंगुन संताच्या मेळ्यात जो
तुझ्या माझ्यात भेटेल सा-यात तो
शोध नाही कुठे या पसा-यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहतो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी राऊळी
बाप झाला कधी जाहला माउली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग पावल का?
बघ उघडुन दार अंतरंगातला देव गावल का…
राहतो माउलीच्या जिव्हारात जो
डोलतो मातलेल्या शिवारात तो
जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
नाचवी विज जो त्या नभाच्या उरी
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवुनी लाट ये जो किना-यावरी
तोल सा-या जगाचाही तो सावरी
राहतो जो मनी या जनी जीवनी
एका पाषाणी तो सांग मावल का?
बघ उघडुन दार अंतरंगातला देव गावल का…
संगीत – अजय अतुल गायक – रुपकुमार राठोड

Subhedaar He Sarjerao

सुभेदार थोर्ले सर्जेराव..अख्त्यारीत सत्तर गावं ..
मर्दुमकी जगाला ठावं..पेशवाईत होतं नाव
असे हे सर्जेराव एकदा शिकारीच्या निमतानं..
रानात शिरले असताना..स्वकियांनी दगा तेला दिला
गनीमानं मोका हेरला ..फसवुन सर्जेरावाला..
भर खिंडीत कि हो गाठला..
अन त्याच वेळी
खंडेराव मर्दाचा चेला ऽऽऽऽऽ हहाहाहाहा हाऽऽऽजीऽऽऽ
खंडेराव मर्दाचा चेला…चालुनिया गेला, आल्या वक्ताला
लढ्ला गडी होवुनिया बेभान ..राखली वतनाची हो शान
गनिमाला दावलं तेनं आस्मान जी जी जी..
खंडेरावाच्या मर्दुम्किनं सुभेदार प्रसन्न झाला.म्ह्नला..
भलेभले रे भले बहादूर.. भलेभले रे भले बहादूर
खरा तू नरवीर ..
पठ्ठ्याहो राखलीस रं लाज
दिला घे तुला सबूत मी आज,
करीन ह्येची परत्फेड मी खास…
आणि थोड्याच दिवसात …ठर्ल्यापरमाने…
सुभेदार जागला शब्दाला..
दिल्या वचनाला.. खंडेरावाला
दिला तेनं गाव उभा वतनात..
सेवेला चाकर हो तैनात
जरीपटका नी घोडा डौलात जी जी..
धनधान्य दिलं चौपट.. हॊ धनधान्य दिलं चौपट
घातली परी अट..
लेकरापरमानं..सांभाळा जीवापाड वतनाला..
आल्यागेल्या भल्याबु-या वक्ताला
जागा आजन्म दिल्या वचनाला..
जिम्मा जो सोपविला मी त्याला..
नका देऊ अंतर या मातीला हो जी जी जी..

गायक – अजय गोगावले

Dil Maza Wanly

नजरेनं केला हल्ला रे
गावामधे झाला कल्ला रे
दिल माझा वन्ली तुला रे मी दिल्ला रे..
दिल माझा वन्ली तुला रे ..

नाहीत्याला काळ वेळ काही
येडा तुझ्या पायी जीव हा
कसं त्याला रोखु सांगना …इल्ला इझी रे बाबा
नको जाळू जीव तोळातोळा
माझ्या मागं खुळा गाव रे

कसं घेउ तुझं नावरे.. इल्ला इझी रे बाबा
गोरा माझा रंग रे ब्युटी माझी तंग रे
कवातरी बोलकी जरा “लव यू” मला रे
नजरेनं केला कल्ला रे
गावामधे झाला गिल्ला रे
दिल माझा वन्ली तुला रे मी दिला रे..

गीत – गुरु ठाकूर
संगीत – अजय अतुल
गायक – श्रेया घोषाल

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top