Bhetates Jevha Kadhi
भेटतेस जेव्हा कधी
कविते,
भेटतेस जेव्हा कधी
एकांताचा होतो मोर
सडा चांदण्याचा दारी
जाते घालून दुपार
भेटतेस जेव्हा कधी
मृगजळ येते हाती
देहाच्या या दिवळीत
उजळती लाख वाती
भेटतेस जेव्हा कधी
माझी मला पडे गाठ
काळजाच्या क्षितिजाला
दिसु लागते पहाट
-गुरु ठाकूर
कवितेचा जन्मसोहळा हा एक आनंदोत्सव असतो….
पण प्रत्यक्ष ती सुचतानाची अनुभूती असते ती वेगळीच असते…
mastch
too late to reply but very great poetry.
भन्नाटच