कळले न कधी, मन झाले पारा
कळले ना कधी ,रुणझुणल्ल्या तारा
कळले न कधी , श्वासातुन माझ्या
का गंध तुझा, दरवाळतो सारा
मागते आता मन साथ तुझी सहवास तुझारे
जीव तुझ्यातहा गुंतला
( male -)
ये आता तू मिठीत या हरवून जा जरा
अंतरा १
कळले नाही एकाएकी कशीरे झाली बाधा ही अशी
कळले नाही बघता बघता कधी रे झाले राधा मी तुझी
अधिर उताविळ होते मन बावरे तुझ्याविना
नकळत माझ्या मोहरते मनावर रंग तुझा रे
मागते पुन्हा मन साथ तुझी सहवास तुझारे
जीव तुझ्यात हा गुंतला
अंतरा २
झरले काही विरले काही उरले नाही माझी मी मला
येना येना देना सारी स्वप्ने वेडी माझी तू मला
फितुर मनाशी बंध असे बांधते पुन्हा पुन्हा
खुलवतो मला अाधार तुझा विश्वास तुझारे
मागते पुन्हा मन साथ तुझी सहवास तुझारे
जीव तुझ्यात हा गुंतला
मागू कसा मी अन मागू कुणा माझी व्यथाही समजावू कुणा
आहे उभा बघ दारी तुझ्या जाणून घेरे जरा याचना
देशील का कधी झोळीत या तू दान माझे मला जीवना
मागू कसा अन मागू कुणा माझी व्यथाही समजावू कुणा
अंतरा १
झोळी रीती आहे जरी
आशा खुळी माझ्या उरी
आर्त टाहो या मनाचा अाहे खरा
घाव अोला काळजाला दावू कुणा
मागू कसा मी अन मागू कुणा माझी व्यथाही समजावू कुणा
आहे उभा बघ दारी तुझ्या जाणून घेरे जरा याचना
अंतरा २
शोधू कुठे माया तिची
तिचा लळा छाया तिची
मी भिकारी जीवनी या आई विना
सोसवेना वेदनाही सांगू कुणा
मागू कसा मी अन मागू कुणा माझी व्यथाही समजावू कुणा
आहे उभा बघ दारी तुझ्या जाणून घेरे जरा याचना
– गुरु ठाकूर .
गणपती बाप्पा मोरया
देवा हो देवा
देवा गणपती देवा
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नम कुरुमेदव
धागड धिन धिन धागड धिन
ताक धिन धिन ताक धिन धिन
गणपती बाप्पा मोरया
देवा हो देवा
देवा गणपती देवा
हम है तेरे पुजारी
हमारी सफल करो पूजा
देवा हो देवा
देवा गणपती देवा
ममतेची याचना चरणी तुझ्या गौरी नंदन
साहू किती वंचना देवा पूर्ण केली हि कामना
मातेचे रक्षण केले निरंतर
मायेचा पदर संभाळण्या
देवा हो देवा देवा हे रंभा देवा
देवा हो देवा गज वंदना देवा
तुही बुद्दी दाता तुही सिद्दी दाता देवा हो देवा
तुही बुद्दी दाता तुही सिद्दी दाता तू हि दयाळू द्यावं है
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नम कुरुमेदव
देवा हो देवा
देवा गणपती देवा
गणपती बाप्पा मोरया
तू एकदंत तू एकदंत
तू वक्रतुंड तू वक्रतुंड
तू गौरीपुत्र गजानन
गजानन गजानन गजानन
तू विघनहर्ता तू गजानन
पितांबर तू लंबोदर