Breaking News
ब्रेकिंग न्यूज
फुंकर दु:खावर घालता येते
अन उ्द्रेकाच्या ठिणगीवरही
ते ठिणगीच निवडतात
कारण ठिणगीचा वणवा होतो
तो विकता येतो वृत्त म्हणून
वणव्याच्या होरपळीतून
नवी दु:खं जन्माला येतात
त्यांच्यावर घातलेली फुंकर विकली जाते
त्याहून अधीक मोलाने
त्यांना जमलंय आता तंत्र
त्यांना माहित आहे मंत्र
इथे जो विकणार तोच टिकणार
आता प्रश्न एकच
यातून नेमकं काय घ्यायचं
हे आपण कधी शिकणार????
– गुरु ठाकूर
Breaking news म्हणजे आजकाल ” खोबरं तिथं चांगभलं ” असं झालंय…because it creates only hangover… & always hammer on people’s mind…. They are only run for news …पण आधी हातात घेतलेल्या news न्याय मिळाला की नाही याकडे कुणाचं लक्षच जात नाही . राहीली गोष्ट यातून आम्ही काय घेऊ …जर वणवा पेटला असेल तर पाणी व्हावे नाहीतर पेटती मशाल होऊन जगायला हवं…..
तुम्हाला काय वाटतं ???????????
आपल्या दुःखावर अणि आतल्या आत धगधगणार्या वणव्यावर आपणच अंकुश ठेवून त्यातून काहीतरी चांगलच बाहेर काढावं नाहीतर “ते” बसलेतच फुंकर घालण्यासाठी…
बर्याचदा आपणच अपेक्षा करतो की कोणीतरी येवून दुःखावर फुंकर घालावी म्हणुन.. मुळात ही अपेक्षाच का करावी?? मग ते येतात अणि फुंकर घालून त्यांचा स्वार्थ साधून जातात…
आपलेच दात अन आपलेच ओठ…