www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook
चंद्रमुखी - Chandramukhi

थांबला का उंबऱ्याशी – Thambala Ka Umbaryashi

तो चांद राती – To Chand Rati

बाई गं – Baai Ga

सवाल जवाब – Sawal Jawab

Thambala Ka Umbaryashi

थांबला का उंबऱ्याशी

थांबला का उंबऱ्याशी
या बसा राजी खुशी
घ्या सबुरीनं विडा
का उगा घाई अशी

इझला कशानं सख्यासजना सांगा
लुकलुकनारा दिवा
वनवा जिव्हारी धुमंसल राया जी
रातभर आता नवा

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा …चंद्रा

रात रंगी रती रंगूनी …चंद्रा
साज शिणगारही लेऊनी … चंद्रा
सूरतालात मी दंगूनी … चंद्रा
आले तारांगणी … चंद्रा

Antra

सरती ही बहरती रात झुरती चांदन्याची
जीवजाळी येत नाही चाँद हाताला
लहरी याद गहीरी साद जहरी काळजाची
घ्या दमानं हया उधानाच्या इशाऱ्याला
अवघड थोडं राया
नजरेच कोडं राया
सोडवा धिरानं साजना

नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत मुरडत झुलवत आले मी
नाजुक छम छम घुंगराची

बान नजरंतला घेऊनी
अवतरली सुंदरा …चंद्रा

रात रंगी रती रंगूनी …चंद्रा
साज शिणगारही लेऊनी … चंद्रा
सूरतालात मी दंगूनी … चंद्रा
आले तारांगणी … चंद्रा

To Chand Rati

तो चांद राती

तो चांद राती तेजाळताना
हे प्राण माझे ओवाळताना
का प्रीत वेडी लाजते
श्वासात वेणू वाजते
येतील हाती ते स्वर्ग साती
आजन्म तू साथदे

अंतरा –
तू जरतारी काठ रुपेरी
मोहरल्या पदराचा
व्याकूळलेल्या या धरणीला
शामल मेघ सुखाचा
जीव उधळला आज तुझ्यावर
टाकूनिया कात रे
येतील हाती ते स्वर्ग साती
आजन्म तू साथ दे

Baai Ga

बाई गं !!!

राती ह्या कनकन सरत जाती
व्याकुळ हे नयन सख्या
नजर उताविळ घडीभर राहिना

बाई गं !!!

बाई गं कसं करमत न्हाई गं
घाव उरी बसला
कृष्णसखा दिसला ||

अवचित वेनू घेऊन हाता
मनमोहन मन चोरून जाता ||

सुदबूद हरपून जाई गं ॥धृ॥

अंतरा
श्वास रंगती प्राण गुंफती अधर झनकारी
उमलते उरी मधुर बासरी देही घुमणारी |

फुलवि तो कळी हळुच कोवळी अधीर झुरणारी
भुलवतो‌ जरी हरवते तरी वेदना सारी ||

शिर्शिरी तनूवर फुलते अशी
श्रावनी सर बरसावी जशी
मी मला विसरुन जाता अशी
बंधने ईरघळली छळणारी

कोरस-
लाज मालवुनी,
या मनात कुनी
चांदरात शिलगावी गं
काळजात कळ
रातरात भर
जागवून जीव जाळी गं
शामशाम बंधनात
देईसाद वेनूनाद बाई गं
रास रंगवुन चित दंगवून
सावळा सजन जाई गं
मोहरल्या कायेवर
मोरपीस थरथरं
रातदिस अठवत राही गं

बाई गं ..कसं करमत न्हाई गं
बाई गं

Sawal Jawab

सवाल जवाब

सवाल- 1 ( आईचा )
नर नारीचे मिलन घडता
जीव नवा ये जन्माला
तिन्हीत्रिकाळी सत्य असेहे
ठाऊक अवघ्या जगताला ||

सांग तु ऐशा मिलनाविना
जन्म कुणाचा झाला गं
कुणा नारीनं कसा अन कधी
चमत्कार हा केला गं ||

जवाब -1 ( लेकीचा )
नसे नारी ती ऐरी गैरी
आदीशक्ती ह्या जगती गं
सांब शिवाची अर्धांगी तीज
माय पार्वती म्हणती गं ||

अंग मलातून बालक रचिला
चमत्कार तो गणपती गं
त्याच गणाची आज थोरवी
कार्यारंभी गाती गं ||

सवाल -2 ( लेकीचा )
सदैव असते सख्या संग जरी
बिलगून त्याला राही गं
अंधारचं बोट धरूनी
कुणा भेटण्या जाई गं ||

देती दुनिया तरी दाखला
या दोघांच्या पिर्तीचा
अंघाराचं गुपित सांग तू
सवाल करते नीतीचा ||

जवाब -2 ( आईचा )
सोबत असते तरी न दिसते
गोष्ट ही न्याऱ्या ढंगाची
अंघारी त्या विरुन जाते
सखी सावळ्या रंगाची ||

युगायुगांचे सत्य असे, ही
सखी सख्या विन नसते गं
शरीर म्हणजे सखा तयाची
सखी सावली असते गं ||

सवाल ( वडिलांचा ) & ( आईचा )

आभाळाहून विशाल भारी
कधी लोण्याहुन मउसुत गं
फिक्की पडती चंदनकाडी
झिजनं‌ त्याचं अद्भुत गं ||

डोईवरली होई सावली
कधी पाठीचा ताठ कना
कधी प्रसंगी तांडव करुनी
होई भोळा सांब पुना ||

देवदानवांनाही होता
प्रत्येकाला असतो गं
नकोस शोधू पुराण पोथ्या
घराघरातून दिसतो गं ||

जवाब ( लेकीचा )

किती वर्णू गं महिमा त्याचा
त्याच्या पायी घडले गं
हरवून जाता त्याची सावली
जगी एकटी पडले गं ||

लाखमोलाचा ऐवज असतो
दुसऱ्यांदा ना मिळतो गं
उमगायाला सोपी आई
बाप कुणा ना कळतो गं ||

जन्म घेई जे त्या साऱ्यावर
त्त्याच्या गुनांची छाप दिसे
सवाल होता फक्कड ज्याचा
जवाब केवळ बाप असे ||

Ka Umaganaa (Kanha)

का उमगंना (कान्हा)

का उमगंना
कसं का समजंना
लागिरं हे तुझं मोहना.. सरं ना..
का तळंमळं मन का घुटमळं
हरवलं काळीज राधेला कळंना
मुरलीचा सूर जुळतो
जीव जळतो त्या घडीला पुन्हा
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
घे तुझ्याच सावलीत कान्हा

का संगतीचं सुख खुनावत राही रं
का बिलगून मन रितं रितं
राही रं
का गुतल्येलं जिनं उसवत
राही रं
का पुनवंच्या संगतीला चांद
नाही रं
अवघड हि विरहाची कळ साहीना
नजर आता जग तुझ्याइन पाहीना
मुरलीचा सूर जुळतो
जीव जळतो त्या घडीला पुन्हा
ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
घे तुझ्याच सावलीत कान्हा

Laaj Galichi Kawali ga (Chirabharni)

लाज गालीची कवळी गं (चीराभरणी)

लाज गालीची कवळी गं
झाली हळदीनं पिवळी गं
हळद लागली सजनाची
रति झाली गं मदनाची
आज झाली तू तरनी गं
रंगली चिराभरनी गं
चांदन्यात
शेज साजनं सुखवील
कळी कोवळी फुलवील

पायी जोडवं चढवील
जीव साजनं जडवील
रीती भातीनं उजवील
चुडा काकनं पिचवील
चांदवा तुझ्या रुपड्याचा
सोन्या मोत्यांन सजवील
चांदन्यात
शेज साजनं सुखवील
कळी कोवळी फुलवील

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top