Dwidha
द्विधा…
मिटल्या डोळ्यांनी मनसोक्त कोसळणारा भादव्यातला पाऊस जडावला कि वातावरणावर विनाकारणच गुढाची वाकळ अंथरली जाते. अशावेळी हि दुपार कि सकाळ कि सांज वेळ? कशा कशाचाच संदर्भ लागेनासा होतो. सारं धूसर अस्पष्ट त्यात संततधारेचा अव्याहत चालणारा सूर मिसळलाकि मनाला हळवं व्हायला निमित्त मिळतं. अंतरंगाचे कोनाडे धुंडाळत ते भिरभिरत सुटतं उसवलेल्या, ढासळलेल्या भूतकाळात मिसळलेल्या अंधुक आठवणींचे शेंडे शोधून तिथेच रेंगाळण्याचा चाळाहि त्याला हवाहवासा वाटतो. हुकलेल्या क्षणांच्या चुकलेल्या गाणितांचा ताळा मांडून पहाण्याचा अट्टाहास देखील त्याला करावासा वाटतो.
त्या शिलकीत हाती लागलेले सल मग मनाचा कल बदलतात. त्या त्या प्रसंगातल्या निग्रहातली निरर्थकता राहुन राहुन जाणवत रहाते. माया मोहाच्या दुलई आड दबा धरून बसलेल्या विरागी वृत्तीला अनाहूत उकळी फुटते. बाहेर सृजनाचा श्रावणी कहर आणि आत वैराग्याला बहर अशी द्विधा अवस्था होऊन जाते.
सुरेख, खूप तात्त्विक !
सुंदर आहे सर.भुतकाळ एखाद्या वेताळा सारखा मानगुटीवर बसून वर्तमानाला आणि भविष्यासाठी जाब
विचारयला लागतो.
होतात अंधुक जेंव्हा वाटा
वाटेवर आठवांचा चालताना
तु माञ तटस्थ रहा
स्वप्न मनातील विरघळूताना …
होवुदे दुविधा,येवुदे संकटे
दरड दुःखाची कोसळताना
तु माञ तटस्थ रहा
आत्मविश्वास ढासळताना
कदम.के.एल.
वा छान!
हुकलेल्या क्षणाच्या चुकलेल्या गणिताचा ताळा…. ह्या एका वाक्याने आयुष्यातल्या केलेल्या चुका आठवल्या, अणि त्या मी परत करणार नाही ही काळजी मी घेईन असा मानाने ठरवला आहे..
तुमच लिखाण डोळ्यात अंजन ही घालत सर…
Wa …!
Baicheni aani dwidha , even all chintan is appreciative. All the best & rock poetics..!