लागट भारी भिर्भीरणारी नजर करते गुन्हा
कशी मी राखू रुपाचा ऐवज ढळतोय पदर पुन्हा
आडुन आडुन लागट बोलुन मला हो खुणावु नका
अंगआंगी या जनु ज्वानीचा मेघ झरे सारखा
रात भिडेनं जाइल वाया भिडेत गोवु नका
डाव इश्काचा अर्ध्यात राया असा सोडुन जाउ नका
जीव जाळू नका दूर राहू नका उगा नजर टाळू नका
आता दाजी उगा वेळ काढू नका रंग रातीचा जाइल फुका
डाव इश्काचा अर्ध्यात राया हिचा सोडुन जाउ नका
रात नेसली ज्वानीचा शालू तिला आवर कसा मी घालू
त्यात मोकाट मदन वारा असा माझं काळिज लागलय डोलू
तोल सुटावा अशा क्षणीया तुम्ही मला सावरा
जरा धिटाइ करा की घाइ रात सरे झरझरा
फुले शहारा नभी इशारा चंद्राचा ओळखा
डाव इश्काचा अर्ध्यात राया असा सोडुन जाउ नका
येण्या आधीच जाण्याची घाइ लै दिसात एकांत न्हाई
उगा अंगार लावुन जाउ नका डोळा डोळ्याला लागत न्हाइ
हाल जिवाचं धनी तुमाला कळायचं हो कवा?
कशी मी देउ सांगा त्याला रोज बहाणा नवा
कुठवर सोसु कळ इश्काची छळतोया गारवा…
डाव इश्काचा अर्ध्यात राया असा सोडुन जाउ नका