Fule Vechita

फुले वेचिता

काल माझे एक स्नेही श्री.उदय पै यांच्याकडे गेलो असता त्यानी मला नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या ‘मोगरा फुलला’ या चित्रमालिकेच्या प्रदर्शनाची एक पुस्तिका दिली.विषय होता संत परंपरा.मी त्यावेळी मुंबई बाहेर असल्याने या संधीला मुकल्याची खंत त्याना बोलुन दाखवली. त्यानी भेट म्हणून दिलेलं ते ब्रोशर घेउन घरी आलो.

रात्री नेहमी प्रमाणे काम करत असताना माझा चुकुन डोळा लागला. अचानक जाग आली तेव्हा रात्रीचा १ वाजला होता. टेबललॅंपच्या प्रकाशात ते ब्रोशर..आणि त्यावरील ज्ञानेश्वर माउलींचे पेंटीग अतिशय सुरेख दिसत होतं..पहाता पहाता त्या चित्राने जणू खेचुन घेतलं.ज्ञानेश्वरांची ती भावसमाधी त्या निर्गुण निराकाराच्या अस्तित्वाची जाणिव करुन देणारं ते अवकाश.ज्ञाताच्या पलिकडील अज्ञाताच्या पोकळीकडे नेणारी ती चौकट.त्या सा-यात हरवल्या सारखी स्थिती झाली अचानक काही सुचतय असं वाटलं मी घाईनं कागद ओढ्ले एक ओळ दोन ओळी असं करता अगदी पाठ असल्यासारखं काव्य एक हाती लिहून झालं..वाचुन पाहिलं अन धक्का बसला ..ओळी अशा होत्या.

ओघळता अमृतवेलू
बहरची अनावर झाला
मोहरला आत्मारामू
गंधाळुनी परिसर गेला

पाझरले ब्रम्हज्ञान
काया मग मिथ्या झाली
आत्म्याचा नाद अनाहत
ब्रम्हांडा भेदूनी गेला

ऊंबराही अज्ञाताचा
तेजाने उजळे अवघा
ज्ञानाचा साक्षात्कारू
त्या ज्ञानियासी झाला…

हे सारं आलं कुठुन ? नेहमीचाच धक्का बसला.असं म्हणतात विचार आणि भावना या अमूर्त असल्या तरी त्यांना एक भाषा असते आणि त्याच विचारांना प्रत्यक्षाची जाणीव मन:पटलवर उमटविणारे दृश्य असते. हेच नेमके मूर्त स्वरूपात येते ते काव्यातून, साहित्यातून तर कधी चित्र-शिल्पातून. कामतांनी जे चित्रातून उभं केलं तेच माझ्या हातून शब्दरुपाने साकार झालं असावं.

3 replies
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    बऱ्याच लोकांचा असा समज असतो की कविता म्हणजे यमकाचे गमक! त्यासोबत थोडं वृत्त आणि छंदाचा अभ्यास केला की ती होते.
    पण ते तसे नसते…. कविता किंवा एखादी रचना होणे म्हणजे संवेदनशील शब्दांचे भावनांशी अनन्य होणे,
    चैतन्याचे स्वरुपाशी अनन्य होणे.
    समर्थांच्या, माऊलींच्या रचना वाचताना हे जाणवतं. ही अनवट रचना तुलाच का सुचली तर सरस्वतीचा त्या क्षणी तुझ्या प्रतिभेला झालेला स्पर्श होता तो!
    माऊलींच्या त्या स्वरुपाशी तुझ्या ठायी असलेलं चैतन्य अनन्य झालं.
    ” दृष्टीचा डोळा पाहू गेलिये l तंव भितरी पालटू झाला” अश्या त्या दिव्य वृत्तीचा साक्षात्कार म्हणजे तुझी ही कविता!
    कविता अशीच येते…अचानक आलेल्या अतिथी सारखी!
    रात्रीच्या त्या शांत प्रहरी जेंव्हा तुझ मन आणि भावना माऊलींशी अनन्य झाल्या आणि कविता एकटाकी उतरली….!

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*