काडी काडी जगण्याचा सावरेना तोल
टिच्चभर सपनं लावी आभाळाचं मोल
कधी भुक भाकरीची चंद्रावानी होई
टाचा घासुन जिझती तेवा हाती येई
उगा लावावा कितिदा नशिबाला बोल
टिच्चभर सपनं लावी आभाळाचं मोल
कशा कशा साठी आम्ही कितीदा झुरावं
जगण्याच्या ओढीपायी कितीदा मरावं
किती बडवावा रोज नियतीचा ढोल
टिच्चभर सपनं लावी आभाळाचं मोल
पेटली मशाल क्रांतीची
उठलं सारं रान
झालो स्वतंत्र आम्ही
ह्यांनी दिलं बलिदान
बलिदान त्यांनी दिलं
स्वातंत्र्य आम्हा गावलं
त्या स्वातंत्र्याचं आम्ही काय केलं?
फुकट मिळाल्या स्वातंत्र्याची
नसे कुणाला पर्वा
हि कथा असे की व्यथा रसिकहो
माय-बाप तुम्ही ठरवा
झेंडा फडकतो जगात उभ्या
दुनिया म्हणते लई भारी
गरिबा घरची सून उपाशी
दार बडवते बेकारी ग ग ग ग ग
साठी उलटल्या स्वातंत्र्याचा
हिशेब काही लागं ना
काय कमावलं काय गमावलं तुमीच सांगा कारभारी
काय कमावलं काय गमावलं
काय कमावलं काय गमावलं
जी जी र जी जी र जी जी र
ओस पाण्याइना गाव
खोल काळजाला घाव
इमान काढलं इकाया
त्याला मात्र आभाळाचा भाव
इमान इकता घबाड मिळते
मोल मिळेना घामाला
हिथं राबत्या शेतकऱ्याचा
जीव टांगतो झाडाला
सत्ते पाई धर्माला बी
आज बसवला बाजारी
काय कमावलं काय गमावलं तुमीच सांगा कारभारी
काय कमावलं काय गमावलं
काय कमावलं काय गमावलं
जी जी र जी जी र जी जी र
सत्य अहिंसा अन् क्रांतीच्या
गेल्या इथुन मशाली
चराचरी या उरला नाही
भलेपणाला वाली
भलेपणाला वाली नाही
कुंपण खाई शेताला
लोणी लुटाया टाळूवरलं
खांदा लावती प्रेताला
कशी जपावी मशाल आम्ही
देशभक्तीची विझणारी
काय कमावलं काय गमावलं तुमीच सांगा कारभारी
काय कमावलं काय गमावलं
काय कमावलं काय गमावलं
जी जी र जी जी र जी जी र