Garhane
गाऱ्हाणे
कालचे कोवळे
आज वाटे जून
जाणिवेचे भान
रोज नवे .
जन्मही कोवळा
अंती जून होई
विरोनिया जाई
काळासवे
जाणती जाणीव
परी हे न जाणे
म्हणोनि गाऱ्हाणे
सुरु राही
– गुरु ठाकूर
कालचे कोवळे
आज वाटे जून
जाणिवेचे भान
रोज नवे .
जन्मही कोवळा
अंती जून होई
विरोनिया जाई
काळासवे
जाणती जाणीव
परी हे न जाणे
म्हणोनि गाऱ्हाणे
सुरु राही
– गुरु ठाकूर
सुरेख ! जाणती जाणीव ?
What is aim behind starting “chintan” …..?
मनात येणारे विचार, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे निरिक्षण, आणि पुढे येणाऱ्या समस्या हि नियमित प्रक्रिया आहे. ह्या सर्वांवर सुचणाऱ्या कल्पना, समस्या सोडविण्यासाठी केलेल्या संकल्पना, आणि सुचलेले निर्णय प्रतिबिंबीत करण्याचा प्रयत्न “चिंतन” ह्या मथळ्याखाली करणार आहे.
Contantly great poetry….!