Garud
गारुड
संन्यस्त विरागी होतो
रिचवून रिपूंचे रंग
जरी वसंत भवताली मी
शिशिरात आपुल्या दंग
मग कळले नाही कुठुनी
हे सूर वेणुचे आले
निजलेल्या गात्रांमधुनी
जणु गोकुळ जागे झाले
ओंजळीत अर्ध्याच्याही
मज दिसते यमुना आणि
स्पंदनात गोपगड्यांच्या
रासाचा ताल निनादे
हे तुझेच गारुड राधे
हे तुझेच गारुड राधे….
– गुरु ठाकूर
“की असे मी बासरी तुझिया अधरी,
काम,क्रोध,मद, मोह,मत्सर काही न वसे अंतरी,
तोच सूर वाजवी मी, तोच सूर वाजवी मी,
जे बोले सखा श्रीहरी ,
श्यामसुंदरच भरून राहे पोकळी ही सारी….”
राधा ही अशी बासरी सारखी …… आणि म्हणून तिचे गारुड कान्ह्यावरती !
Sundar ?