Geet Lekhan Karyashala – Kalasangam 28-29 Feb and 01 Mar

कविता-गीतलेखन कार्यशाळा by गुरू – कलासंगम 28-29 Feb & 01 Mar

दि. २८ व २९ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने ‘कलासंगम’ महोत्सव आयोजिण्यात आला. य़ा आनंदसोहळ्यात गुरू ठाकूरने कविता-गीतलेखन या विषयावर कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये त्याने गीतकार म्हणून जमविलेल्या अनुभवांची समृद्ध शिदोरी खुली करत रसिकमनावर शब्दसुमनांची बरसात केली.

” मोबाईल मधून वेळ काढून तुम्हाला ऐकायला आतुरलेली, तुमच्याशी संवाद साधायला आसुसलेली , खळाळून दाद देणारी, कडाडून टाळ्या वाजवणारी रसरशीत जिवंत माणसं भेटणं हा खरंच दुर्मिळ योग . हा योग काल जुळून आला पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटच्या ऐतिहासिक वास्तूत. निमित्त होतं महाराष्ट्र टाइम्सने आयोजित कलासंगम मैफिलीचं. पुणेकर रसिकांचे मनापासून आभार.” – गुरू ठाकूर

 

1 reply
 1. Shilpa Khare
  Shilpa Khare says:

  वाह गुरु फारच छान.
  अलोट आणि दर्दि रसिकांची गर्दी ! आयुष्यात गुरु भाग्यवंताला भेटतो असं म्हणतात. तीन दिवस दोन दोन तास हा छान गुरूयोग… म्हणजे सोन्याहून पिवळ!

  तुझ्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध कंगोरे तुझ्या लिखाणातून आणि प्रतिभासंपन्न कलेतून सगळ्यांना दिसतच असतात. पण प्रत्यक्ष तुझ्या समोर बसून तुझे अनुभव अमृततुल्य शब्दात ऐकण्याची अनुभूती काही औरच !
  ती तमाम जनता भाग्यवान म्हणेन मी ज्यांना ही अनुभूती मिळाली.

  मी पुण्यात असताना कार्यशाळा व्हायला हवी होती. …

  Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*