हे.. डोस्क्या मंदी भणाणलं
पिरितीचग वारं
आन दणा दणा वाजतया
काळजाचं दारं
(आल्या बॉ आमच्या वहिनी)
अर्र.. डोस्क्या मंदी भणाणलं
पिरितीचग वारं
अर्र.. दणा दणा वाजतया
काळजाचं दारं
हे तुझ्या नावं काढतोया
बदामाच पिक
सोडतूया त्याच्यातून
तीर आरपार
चाळा कळना ह्यो कव्हा
कधी भलता लागला
{ तुझ्या नजरच्या ठिणगी न गं
वणवा पेटला } ३
तूच तान्ह भूख
सुख तुला पाहण
खुळ्यागत तुझ्या माग
माग राहण ग
नाव गाव माझं मझ्या
राहीना ध्यानी
जीव पिसा फिरे
तुझ्या सावली वाणी
घरं दारं काय बी
आता ग्वाडचं लागणा
किती डाव बघू तुला
तहानच भागना
चाळा कळना ह्यो कव्हा
कधी भलता लागला
{ तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं
वणवा पेटला } ३
चर्चेमंदी आजकाल
माझ वागण
झाल म्हणती मला
पिरतीची लागण
तुझ्यापाई जीता झाला
पापणीत झरा
रोज नवा पडतोया
काळजाला चरा
खुळ्यावानी झालो आता
शहाणपणा चालना
किती डाव बघू तुला
तहानच भागना
चाळा कळना ह्यो कव्हा
कधी भलता लागला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं
वणवा पेटला
जिथं तिथं नडतय
हिच्या पायी आडतोय
पिरतीचा माझ्या घोडा
हिच्या विना मामला
अडाणी सारा हे
असखास घालतय खोडा
अहो सोडा मला
English शिकवून सोडा
हिला English शिकवून सोडा
हो Sir हिला English शिकवून सोडा
कधी L U – L U म्हणतोय
कधी नुसताच Miss U धाडतोय
रोज Message मंदी राया
काय कळंना English फाडतोय
कसं जाणू ओ मी त्याच्या मनातलं
भाषेनंकेला राडा
आता सोडा मला
English शिकवून सोडा
हिला English शिकवून सोडा
हो Sir हिला English शिकवून सोडा