Pari Mhanu ki Sundara
परी म्हणू की सुंदरा, तिची तर्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा, ही मेनका कुणी जणु निघाली
तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासुनी, हळूच जीभ चावणे
मोकळा करुन मीच हे कधीच दिलं तिच्या हवाली
तिची अदा करी फिदा, ही मेनका कुणी जणु निघाली
हजारदा ती भेटते, बोलु बोलु वाटते
बोलणे मनातले परि मनीच राहते
मोहिनी तिची अशी, फुले जशी हजार भोवताली
तिची अदा करी फिदा, ही मेनका कुणी जणु निघाली
Hi Gulaabi Hawaa
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा
हाय श्वासातही, ऐकू ये मारवा
तार छेडी कुणी, रोमरोमातुनी
गीत झंकारले, आज माझ्या मनी
सांज वाऱ्यातही, गंध दाटे नवा
ऐकू ये मारवा …
का कुणी रंग हे, उधळले अंबरी
भान हरपून मी, कावरीबावरी
का कळेना तरी, बोलतो पारवा
ऐकू ये मारवा …