Tiring Tiring
सुटला काळजाचा तोल झाला झोल इथे रे
रोमियोबी स्वर्गामधी गलबल्ला
जनता पॅक आणि शाॅक सारे मजनू इथे रे
करामत भावा तुझी लय कल्ला
सरलं रापनं
हितंयिथं टापनं
निकाल आज लागला
कसा काय सांगतू
बदामात तीर हा
अचूक आज मारला
फोन टिरिंग टिरिंग टिरिंग वाजला
कुटली पुन्याइ बा पावली तुला
लाटरी डायरेक लागली तुला
आमी भैताड गड्या काही कळंना
ज्युल्येट सांग कशी गावली तुला
पाखरा मागं मागं
धावनं नाही आता
सपनांत रोज खुळ्या
झुरणं नाही आता
मॅटर गड्या रे तुझा गाजला
फोन टिरींग टिरींग वाजला
तिच्यामागे जन्तासारी ट्वेंटी फोर शेवन
तिची रोज आरती तिचाच रे भजन
भले भले धारातिर्थी नादानं जिच्या
कसा तुझ्या हाती तिचा लागला टोकन
म्हसोबा मुंजोबा की
पावला खवीस तुला
कुणी सांग दावला हा
सोनियाचा दीस तुला
सिग्नल कसा रे ग्रीन गावला
फोन टिरींग टिरींग वाजला