Udaraat Taho
उदरात टाहो
उदरात टाहो
पदरात भीती
नियतीच अब्रू
लुटणार किती
सल उरात हा
दचकून जीनं
दिनरात भाळी
भयभीत वाटा
पळणार किती
सल उरात हा
भोग हे रोजचे
सोसणे रोजचे
राख होऊनही
पोळणें रोजचे
घाव जिव्हारी जखम उराशी भळभळते
वणावा नेसून शहर मुक्याने हळहळते
राख तुझ्या स्वप्नांची येऊन सावडते
वणावा नेसून शहर मुक्याने हळहळते
अंतरा
धुमसून आशा विझल्या सुखाच्या
चेहरा उद्याचा अंधारलेला
मिटली कवाडे सुटले किनारे
का वेदनेचा हा क्षण गोठलेला
भोग हे रोजचे
सोसणे रोजचे
राख होऊनही
पोळणें रोजचे
घाव जिव्हारी जखम उराशी भळभळते
वणावा नेसून शहर मुक्याने हळहळते