मनोगत

खरंतर कुठेतरी पोहचायचं या हेतूने कधीच प्रवास सुरु केला नव्हता. कारण तसही केवळ अंतिम ध्येयावर डोळा ठेवून वाटेत येइल ते पायदळी तुडवत धावणाऱ्यांपैकी मी कधीच नव्हतो. ज्या क्षणात आहोत तो क्षण १००% साजरा करायचा या वृत्तीनं माझ्यातल्या कलावंताला रुजण्याकरता वेळ आणि बळ दिलं असावं. म्हणूनच काहीही न ठरवता सूरु केलेला हा प्रवास रंजक होत गेला. त्याचं सारं श्रेय मला पावलोपावली सच्च्या रसिकाच्या रुपांत भेटलेल्या परमेश्वराला मी देतो. कारण पदोपदी तो मला भेटला नसता तर माझ्या सारख्या बुजऱ्या अबोल मुलाचं चित्रकार, कवी, नाटककार, गीतकार, पटकथासंवादकार, अभीनेता असं चहू बाजूनी बहरणं केवळ अशक्य होतं. खोडकरपणॆ मी काढलेल्या व्यंगचित्रांची पाठराखण करणारे प्राध्यापक असोत वा माझ्या करता उत्तमोत्तम पुस्तकं वेगळी काढून माझी वाट पहाणारा रद्दीवाला असो अशा अगणित चेहऱ्यांच्या बिनचेहऱ्यांच्या माणसांनी माझ्या सुरवंटाचं फुलपाखरु होण्याच्या प्रवासाला हातभार लावलाय. त्यांचे ऋण मी कधीही विसरु शकत नाही. म्हणूनच प्रत्येक नव निर्मिती आधी हात जोडून इतकच मागणं मागतो.

रसिक होवू दे दंग चढू दे रंग असा खेळाला
साता जन्माची देवा पुण्याई लागूदे आज पणाला…

Monologue

Honestly, I didn’t have any destination in my mind when I set off on this journey since I was never one of those who would simply run after their goal and dreams and will not enjoy the present moment. Living in the moment and living it to the fullest is my tendency and that gave the strength and time to flourish the artist in me. And for that very reason, this unplanned journey became so interesting. All credit goes to the God Almighty I met in the form connoisseurs at every step of the way. If it was not for him, it would have been impossible for a shy and bashful person like me to flourish as an artist, poet, screenplay writer, an actor. Be it the professor who supported my caricatures that I drew mischievously during my college days or the “Raddi wala” who would pick and keep some good books aside for me, such countless known and unknown people have helped me during this process of becoming a butterfly from a caterpillar. I shall forever be grateful to them, and hence, at the beginning of any new creative venture, humbly I pray with folded hand:

Let the play begin and get the connoisseurs enthralled,

Let the good karma of all my past lives help me in this endeavor today…