Jam Jahale Traffic Bai
जॅम जाहले ट्राफिक बाई (विडंबन)
परवा जॅम मधे २ तास अडकलो पण तिथेही सुचलंच..
(संथ वह्ते वाहते कृष्णामाई च्या चालीवर )
जॅम जाहले ट्राफिक बाई जॅम जाहले ट्राफिक बाई
नाक्यावरचा ट्राफिक पोलीस जागेवरती नाही
स्कूटर मोटर आणिक रिक्षा
ऊभे बापडे भोगीत शिक्षा
तशात येऊन अवचित हिजडा ऊड्वी उडवी त्राहीत्राही
जॅम जाहले ट्राफिक बाई ….
आधी ऊकाडा त्यात प्रदुषण
नरक जाहले अवघे जीवन
कुणी हासडी शिव्या ऊगीचच उगीचच कोणी गप्प राही.
जॅम जाहले ट्राफिक बाई ….
रिक्षेमधे कुणी बैसला
ट्याक्सी पकडुन कोणी फसला
मीटर वाढता बघुन कुणाचा प्राणच निघोनी जाई
जॅम जाहले ट्राफिक बाई ….
प्रतिभावान माणसाला त्याची प्रतिभा स्वस्त बसू देत नाही हे खरं !संथ वाहते कृष्णामाई च्या चालीवर केलेली ही कविता आवडली