Kaach
काच…..
खिडकीच्या काचेपल्याड
एखाद अनोळखी घराच्या
आडोशाला
मुसळधार पावसात
घोटभर चहा करता
अगतिक
एक चिम्ब हुडहुडी
अन
काचेअल्याड
वाफाळता चहाचा मग…
धग निवून जाण्याआधी
कुणीतरी स्वीकारावं
या प्रतीक्षेत
अगतिकच
मधल्या काचेला
काय म्हणावं ?
नियती?
की परिस्थिती?
-गुरु ठाकुर
काचेला हे इतकं निराळं पण अगदी समर्पक रूपक वाह्…खरयं, नियती म्हणा किंवा परीस्थिती म्हणा, त्यांना दृश्य अस्तित्व नसलं तरी माणुस अगतिकचं त्यांच्यासमोर…
एक सांगू ?!
एकदा मनानेच स्पर्श करून पाहा , जाणवेल त्या स्पर्शातील अपार सामर्थ्य , परिस्थिती आणि नियतीच्या भिंती कोसळतील आणि मग होईल तो साक्षात्कार…प्रेमाचा!
स्पर्शतील संवेदनेमध्ये सुद्धा सहजता हवी रे…
सर्व जाणीवा एकीकडे आणि स्पर्श एकीकडे..
परिस्थिती की नियती असा प्रश्न पडला ना की सर्वात महत्वाचं स्पर्श नावाचं इंद्रिय वापरावं कारण जे इतर इंद्रियांना दुरापास्त आहे ते स्पर्शातून व्यक्त होतं…
भक्ती काय किंवा प्रीती काय स्पर्शा शिवाय व्यक्तच होऊ शकत नाही.
स्पर्शातून समाधिपर्यंत पोहोचता येतं…तू कलावंत आहेस… शब्दस्पर्श तुला नक्कीच उमगला असेल…
नव्हे आहेच….
कविता खूप आवडली….तुझी कविता नेहमीच लेखन आणि चिंतनास प्रेरणा देते.
अगतिकता दोन्हीकडे सारखीच, तिची तीव्रता सुद्धा दोन्हीकडे सारखीच,
प्रेमाची असेल तर ती परिस्थितीवर मात करेल….कारण अगतिकतेला सुद्धा भिती आणि नितीच कुंपण नसतं…
पण सोयीचा निर्णय असेल तेंव्हा ती ….”नियती” म्हणायला हरकत नाही…!