जगदीशा दर्शन देशील का
शोधत फिरतो तुला कधी तू समोर येशील का
जगदीशा दर्शन देशील का जगदीशा दर्शन देशील का
जगदीशा दर्शन देशील का जगदीशा दर्शन देशील का
कुणी सांगतो सदैव असतो
अवती भवती तुझाच वावर
कुणास शंका मंदिरातल्या
पाषाणी त्या तू असण्यावर
कोण चुकीचे कोण बरोबर उत्तर देशील का
अनंत नावे तुझी सांग तू
कुठल्या नावे तुला पुकारू
अनंत नावे तुझी सांग तू
कुठल्या नावे तुला पुकारू
भेटशील तू कुठे नेमका
ठाव तुझा मी कुणा विचारू
मनातले या सांग तू तरी समजून घेशील का
जगदीशा दर्शन देशील का जगदीशा दर्शन देशील का
Song Credit –
Movie – Kaanbhatt
Singer – Adarsh Shinde
Music – Rahul Ranade
Lyricist – Guru Thakur
दूर वाटा साद देती
दूर वाटा साद देती
दे दिशांच्या हात हाती
घे भरारी उंच बाळा
कल्पनांशी जोड नाती
कूस मायेची तुला
जायची सोडून रे
सोबती आहे तुझ्या मी
सावली होऊन रे
ओल येते पापण्यांना
सांझताना जीव तुटतो
नजर वळते, उंबऱ्याशी
घास ओठाशीच अडतो
ऐकू येते हाक आई
ना कळे कोठून रे
सोबती आहे तुझ्या मी
सावली होऊन रे
सोबती आहे तुझ्या मी
सावली होऊन रे
Song Credit –
Movie – Kaanbhatt
Singer – Vibhavari Apte Joshi
Music – Rahul Ranade
Lyricist – Guru Thakur