Kar Have Tevdhe War
कर हवे तेवढे वार
नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो
मानणार ना तरी कधी मी हार म्हणालो
केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो
रिचवुन सारे तुडुंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही आभार म्हणालो
खेळवुनी मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडुन तिला तैयार म्हणालो
रडलो नाही लढलो,भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन याल्गार म्हणालो
अतिशय प्रेरणादायी कविता आहे… सर, please its a request… ही कविता तुमच्या आवाजात ऐकायला मिळू देत. Please वाचन होवू देत ह्या कवितेचं.
Thank you.