Kase Nighave

कसे निघावे?

या देहाचा कोष भेदूनी
वाटे डोही चिरंतनाच्या
झोकून द्यावे..
पण आत्म्याच्या खोल मुळाशी
रुतल्या पारंब्या मोहाच्या
काय करावे ?

गूढ कोठली काजळमाया
सांगे आता  उचला गाशा
शिणल्या थकल्या गात्रांमधूनी
वैराग्याचा वाजे ताशा
छिन्न पाउली परि ठुसठुसतो
स्वार्थाचा हा छचोर काटा
कसे निघावे?

-गुरु

16 replies
 1. Abhishek khavale
  Abhishek khavale says:

  “पण आत्म्याच्या खोल मुळाशी
  रुतल्या पारंब्या मोहाच्या
  काय करावे?”.
  हे खूप छान सांगितलं तुम्ही, तुमच्या शब्दात. खरंच तुमची प्रत्येक कविता विचार करायला लावते.खूप छान गुरु दादा.

  Reply
 2. Dr namita nikade
  Dr namita nikade says:

  सर, “असे जगावे…” हे शिकवल्या नंतर आता, “कसे निघावे” हेही तुम्हीच सांगा… जेणे करून निघणे हे निस्वार्थी होईल..

  Reply
 3. admin_GT
  admin_GT says:

  Anonymous ?,
  एका वाचकाने “Anonymous” या नावाखाली आपलं मत मांडलं आहे.
  नाव आणि पत्ता असल्याशिवाय मत स्वीकारण्यात येणार नाही.
  कृपया नाव आणि पत्त्यासकट परत आपलं मत प्रदर्शित करावे हि विनंती.
  आपला नम्र,
  साईट नियंत्रक

  Reply
 4. आसावरी देशपांडे
  आसावरी देशपांडे says:

  देहाचा कोष ते पावलात रुतणारा स्वार्थाचा छ्चोर काटा… कित्ती अवघड प्रवास ..खूप छान व्यक्त झाला आहे…केवळ सुन्दर

  Reply
 5. आशिष चौबळ.
  आशिष चौबळ. says:

  खरच…कसे निघावे…??
  आपल्या असण्या साठी कीती स्वार्थी असतो आपण..

  Reply
 6. Amit vichare
  Amit vichare says:

  Kya baat hai Guru Dada… Khup chaan rachana aahe. Vichar karayla lavanari, arthat tuji pratyek kavita khup bhavate manala. Manapasu waat baghat asto me tujya kavitanchi.
  Asach chaan chaan lehat raha, hich sadichaa… Dhanyawad..

  Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*