तू असशील तिथेच रमते
भोवती तुझ्या भिरभिरते
रोज शोधुनी नवा बहाणा
तुझ्या त हरवुन बसते
मन तुझ्याच साठी झुरते
मन तुझ्याच साठी झुरते
तो
हसतात लोक बघणारे
म्हणती मी तुझा दिवाणा
प्रेमाचा हळव्या माझ्या
सोडवना तूच उखाणा
शब्दांचे मोहळ माझ्या
ओठावर येउन अडते
मन तुझ्याच साठी झुरते
मन तुझ्याच साठी झुरते
ती
कळतात मलाते सारे
भलभलते तुझे बहाणे
वाटते मलाही हवेसे
चोरून ते तुझे पहाणे
आरशातही माझ्या जागी
चेहरा तुझा मी बघते
मन तुझ्याच साठी झुरते
मन तुझ्याच साठी झुरते
बोलवेना सोसवेना या जीवाची वेदना
गुंतविला जीव वेडा एवढा झाला गुन्हा
सोडलास तू हात हा जरी
सोडवू कशा सांग भावना
ठेच लागल्या पावलांस या
कोणती खरी वाट सांगना
स्वप्न भाबडे आज भंगले
बंध रेशमी का दुभंगले
सुन्या सुन्या जीवनी या
सुन्या सुन्या जीवनी या
कोण जाणे प्राक्तनाने काय गोंदले
गुज माझ्या अंतरीचे सांग मी सांगू कुणा
गुंतविला जीव वेडा एवढा झाला गुन्हा
चाहुली तुझ्या या खुणावती
भास बोलके वेड लावती
सूर ओल्या आठवांचे
सूर ओल्या आठवांचे
पोळलेल्या या मनाला साद घालती
काळजाला जाळती कालच्या सा-या खुणा
गुंतविला जीव वेडा एवढा झाला गुन्हा
– गुरु ठाकुर