Kunich Nasata Aapla Kadhi
कुणीच नसतं आपलं कधी
कुणीच नसतं आपलं कधी
म्हणतात मात्र सारे
शिड फिरवुन जातात निघुन
फिरतात जेव्हा वारे
म्हणून म्हणतो ठेव ध्यानात
माणसांच्या या निबीड रानात
तगवण्या साठी तुझं झाडं
केवळ प्रकाश शोधुन काढ
त्याच्याकडे पाहुन वाढ
येतील जातील वादळ वारे
नसेल कुणी सावरणारे
तोल तुझा ढाळु नको
उगाच पानं गाळू नको
घटका पळे ऋतू सहा
प्रत्येक क्षण जगुन पहा
आभाळाची ओढ घेवून
मुळं रोवुन ऊभा रहा
मात्र उंच जातानाही
तत्व एक सोडु नको
ज्या मातीत रुजुन आलायस
मन तिचं मोडु नको…
-गुरु ठाकूर
कवितेचे पान मध्ये ही कविता तू वाचली होतीस. खूपच आवडली. कितीतरी वेळा ऐकली , प्रत्येक वेळा तोच आनंद देते , मनाला उभारी देते ही कविता.
तू ही एकटाकी लिहिली आहेस असं वाटतं…
खूप आवडते ही कविता मला…..विशेषतः शेवटच्या ओळी …ज्या विनम्र, शालीन राहायचा संदेश देतात.
तू सुद्धा असाच विनम्र आणि शालीन आहेस.
Inspirational
भारी लिहीता गुरू भाऊ…
Khup sundar?
खूप छान…
वाह गुरु …
मन तिचं मोडू नको इथं सगळं आलं