Lata Aani Taal 06 February 2022
लता आणि ताल
बिंब प्रतिबिंब
सूरातच चिंब
जन्म सारा.
विरे पंचत्वात
देहाचा कापुर
उरे मागे सूर
चिरंजीव.
श्रवणेंद्रियांना जाण आली तेव्हा पासून तिथे घट्ट बिलगून बसलेला लता दिदिंच्या गळ्यातून उमटलेला सूर हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि जोवर जाणिवा जाग्या आहेत, कुडीत प्राण आहे तोवर तो दरवळत राहिल . त्यामुळे त्या गेल्या,त्या नाहीत हा विचार पटत नाही..पचत नाही .
त्यांच्याच गाण्यात त्या म्हणून गेल्यात..तेच शब्दशः सत्य आहे.
“तुम मुझे यूँ भुला ना पाओगे …जब कभी भी सूनोगे गीत मेरे संग संग तुम भी गुन गुनाओगे ..”
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!