विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा
दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा
आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनांत भाबड्या लेकरांचा लळा
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली
पुंडलिक वरदे हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
जीव भुलला, रुणझुणला,
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला
क्षण हळवा गुणगुणला,
बावऱ्या या क्षणा श्वास हा गंधाळला
सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती
भावनांचे शब्द व्हावे गीत ओठी मोहरावे
हरपुनी हे भान जावे, ये जरा
दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती
प्रेमरंगी मी भिजावे ते तुला ही जाणवावे
पांघरावे मी तुला अन ये जरा
लय लय लय लय भारी मस्तीची पिचकारी
जोडीला गुल्लाल रे
भीड़ भाड़ सोडून
बेभान होऊन
धिंगाना घालुया रे
ये भांगेच्या तारेत
रंगाच्या धारेत
राडा चल घालुया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया,
आज पीरतिच्या रंगाची ही चडली या नशा
आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया,
हो हो हो. . . . . .
चालून आली आज वरसान संधी
तशात भांगेची चडली या धुंदी
चिंब होऊया रंगात रंगु ये ये ये ये
हे जा रे जा तु शोधु नको तू बहाना
फुकट साधु नको रे निशाना
नको छेडू तू सर्वा दमान घे घे घे घे
हो होळीच्या निमितान घालुया थैमान
मोकाट हे राण सार अताहा
ये भांगेच्या तारेत
रंगाच्या धारेत
राडा चल घालुया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया,
ओ तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला
सोडु कसा सांग मौका रसीला
आज जोडीन करूया कल्ला तू ये तू ये तू ये
ये फितूर झाले हे फंडे पुराने
रूपाचे माझा रे छप्पन दीवाने
गिरकी घेऊनी मी दुनिया खिशात रे
ओ नजरेच हे बाण सोडून बेफ़ाम
झालोय हैरान येड़ा पिसा हा हा
ये भांगेच्या तारेत
रंगाच्या धारेत
राडा चल घालुया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया
आज पीरतिच्या रंगाची ही चडली या
नशा. . . . .
आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया
हे लय भारी . . . . .
करतो इशारा
आवेग माझ्या
बेभान श्वासातला
हो पेटुनी आता
चेतुनी आता
अंगामध्ये हरपला
हा गार वारा फुलणारा शहारा
या देहमावरला आता मला सोसेना रे
ओठाचा माझ्या हा प्याला
भरलेला रे आतुरलेला
ओठी तुझ्या लाव ना रे
ये ना साजणा
बरसुन घे
ये ना साजणा
स्पर्शुन घे
घे ना रे
करतो इशारा
आवेग माझ्या
बेभान श्वासातला
पिसाटलेला उधाणलेला
हा जीवघेणा नशिला समा
आसुसलेल्या मिठीत ओल्या
घायाळ हो ना जरा साजणा
स्पर्शातील गोडी अवेळी चालणारी
ही हुरहुर थोडी
ओळखू कशी सांग ना रे
ओठाचा माझ्या हा प्याला
भरलेला रे आतुरलेला
ओठी तुझ्या लाव ना रे
ये ना साजणा
बरसुन घे
ये ना साजणा
स्पर्शुन घे
घे ना रे
बेभान काया हि मोहराया
व्याकुळ हि रात रे कोवळी
खुलवून जा ना फुलवून जा ना
अलवार तू पाकळी पाकळी
हा गोठलेला थिजलेला
भिजलेला साजणा विजलेला
एकान्त शिलगाव ना रे
हा गार वारा फुलणारा शहारा
या देहमावरला आता मला सोसेना रे
ये ना साजणा
बरसुन घे
ये ना साजणा
स्पर्शुन घे
घे ना रे