www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

M S Dhoni Juke Box

Ghe Dhyaas Ha

Shwasatun Tu Daravalta

Ashich Thamb Na Jara 1

Ghe Dhyaas Ha

घे ध्यास हा (Besabriyan)

धावणे का हे जिंकण्यासाठी
जीवना दे रे तू वेगळे काही
धावणे का हे जिंकण्यासाठी
जीवना दे रे तू वेगळे काही
ठरवून का मग जावे कुठे
जाउ तिथे मन नेते जीथे
घे ध्यास हा

अंतरा १
येईल हाती आभाळ सारे
जोवर तुला हा विश्वास रे
सर्वस्व आहे आता तुझे रे
हे वेड आणि ही आस रे
मग का अाता उगिच हे थांबणे
जाउ तिथे मन नेते जीथे
घे ध्यास हा

अंतरा २
अंधार अाहे की तेज आहे
पल्याड याच्या जाशील तू
या चांदण्याची परवा तुला का
तेजाळतारा होशील तू
शोधायचे मार्ग का ते जुने
जाउ तिथे मन नेते जीथे
घे ध्यास हा

Swasatun Tu Darvalta

श्वासातुन तू दरवळता (Kaun Tujhe Yun Pyaar Karega)

श्वासातुन तू दरवळता
मन हलकेच उमलते रे
तुझ्या मनाच्या भवताली
मी अलवार तरळते रे
झुळुक हवेची हलकीशी तू
मी वाळू सम उडते रे
हरवून जाते तुझ्यामधे अन
तुझीच केवळ ऊरते रे

अंतरा १

माझी ही वेडी नजर तुझ्याचसाठी झुरे
सांगू कसे जग हे तुझ्या विना ना उरे
तुझ्या मधे अशी, मी विरुन चालले ,
आहे तुला का ही खबर
मी विसरुन तनमन माझे
तुज भवती भिरभिरते रे
हरवून जाते तुझ्यामधे अन
तुझीच केवळ ऊरते रे

अंतरा २
होता तुझी मी जरा , नादावली पावले
रोखू कसे सांग तू, मन आज भांबावले
माझे हसू ही मी, तुझ्यात शोधते रे
माझ्या सुखाचा तू बहर
क्षणभर नाही तू दिसला
नकळत मन हुरहुरते रे
हरवून जाते तुझ्यामधे अन
तुझीच केवळ ऊरते रे

Ashich Thamb Na Jara - 1

(Jab tak 1 – Honymoon)

अवखळ स्पर्शातली
शिरशिरी तू मलमली
तनमन हरपून हे
पाहतो मी जोवरी
अशीच थांब ना जरा
जवळ ये पुन्हा जरा
अशीच थांब ना जरा
जवळ ये पुन्हा जरा
हो होहो…होहो

डोळ्यातल्या ..खोल डोहात या
शोधतो मी मला…शोधतो मी मला
एकांत हा…एकदा ऐकना
काय सांगे तुला.. काय सांगे तुला

रिमझिम मल्हार हा
प्रितीचा झरतो मनी
अलगद बरसात ही
झेलते मन जोवरी
अशीच थांब ना जरा
जवळ ये पुन्हा जरा
हो होहो…होहोहो

Dhundicha Kshan Ha Ola

(Phir kabhi)

धुंदीचा क्षण हा अोला
प्रीतीने मंतरलेला
सांगेहा तुला ऐकना
बरसू दे ना मनाला
कऴुदे ना रे जगाला
साऱ्या चिंब अोल्या भावना
विसरु माझे तुझे अन
जाऊ हरवून आता
सांगू या क्षणाला थांब ना.. हां हां थांब ना

अंतरा १

ना बोलता ही कळाले अोठातले गूज सारे
वाचून घे या क्षणीतू नजरेत संवाद सारे
हळवेसे.. मोहरलेले सतरंगी… मन हे माझे
पुकारे तुला ऐकना
बरसू दे ना मनाला
कऴुदे ना रे जगाला
साऱ्या चिंब अोल्या भावना
विसरु माझे तुझे अन
जाऊ हरवून आता
सांगू या क्षणाला थांब ना.. हां हां थांब ना

अंतरा २
तू सांग माझे मला का नादावणे हे कळेना
ऐकू मला येई सारे जे जे तुला बोलवेना
डोळ्यांची… कळली भाषा
जुळलेले… सुर हे आता
छेडू चल पुन्हा ये जरा
बरसू दे ना मनाला
कऴुदे ना रे जगाला
साऱ्या चिंब अोल्या भावना
विसरु माझे तुझे अन
जाऊ हरवून आता
सांगू या क्षणाला थांब ना.. हां हां थांब ना
जाऊ हरवून आता

Parva Naahi

पर्वा नाही

अवघड जरा रस्ते जरी पर्वा नाही
अस्फूट स्वप्ने ही जरी पर्वा नाही
उरी घाव आहे वाहतो
कसली आता पर्वा नाही

सणकी मन होते कधी लहरी मन होते कधी
धुमसे येता येता जहरी मन होते कधी

सणकी मन होते कधी लहरी मन होते कधी
धुमसे येता येता जहरी मन होते कधी
घनघोर सारी वादळे रिचवून होवू मोकळे
भिडण्यास सज्ज रे किती येवो संकटे
पर्वा नाही

अंतरा १

खरी खोटी माहित नाही स्वप्नांवरती जगतो रे
नसले हाती जरी तारे काजव्या संगे ही रमतो रे
बेभानलेली स्पंदनेश्वासात वेडी वादळे
जिद्दीस पेटलो काही बिघडो वा घडो
पर्वा नाही

अंतरा २

श्वासांमधला वणवा रे तो रात्रंदिन भडकतो रे
भय ना पाण्याचे त्याला रे ही आग आगीने विझतेरे
झेपवण्याचा ध्यास हा अन चेतला विश्वास हा
आगीत चालू रे मग वितळू वा जळू
पर्वा नाही

Ashich Thamb Na Jara - 2

(Jab Tak 2 – dating)

जोवर श्वासातला
गंधना होतेस तू
जोवर या स्पंदनी
नाद ना होतेस तू
अशीच थांब ना जरा
जवळ ये पुन्हा जरा
अशीच थांब ना जरा
जवळ ये पुन्हा जरा

जोवर श्वासातला
गंधना होतेस तू
जोवर या स्पंदनी
नाद ना होतेस तू
अशीच थांब ना जरा
जवळ ये पुन्हा जरा
अशीच थांब ना जरा
जवळ ये पुन्हा जरा

कणकण तुझ्या, सहवासातला
भास वाटे मला..भास वाटे मला
हे मलमली …तुझे स्पर्श की
स्वर्ग आहे नवा… स्वर्ग आहे नवा
जोवर नजरेतला
नूर ना होतेस तू
जोवर अोठातला
सूर ना होतेस तू
अशीच थांब ना जरा
जवळ ये पुन्हा जरा
अशीच थांब ना जरा
जवळ ये पुन्हा जरा

Hoshil Tu Nabab

होशील तू नबाब
दाखवूया गणिताला ठेंगा
झेपेना रे हा होमवर्कचा दंगा
घोकंपट्टी चा डोक्याला भुंगा
झालं केव्हा पानिपत हे सांगा
अभ्यासाचा ताप जरा
विसरुन आज खरा
चला चला कल्ला करुया

Sis: केलास जर अभ्यास तर होशील तू नबाब
फुकट खेळाच्या नादाने होशील तू खराब

MS: खेळाच्या नादाने वाढेल रे रुबाब
फुकट केलास जर अभ्यास तर होशील खराब

अंतरा १
Sis: टिंगल टवाळी जरा लांब ठेवा
करणार मनापासून अभ्यास केव्हा

MS: अभ्यासाचे गं जरी आमचे वांदे
तरी मैदानावर लावू अाम्ही झेंडे
परिक्षेची भीती का रे
पोटभर खेळूयारे
चला चला कल्ला करुया

Sis: केलास जर अभ्यास तर होशील नबाब
फुकट खेळाच्या नादाने होशील खराब

MS: खेळाच्या नादाने वाढेल रे रुबाब
केलास जर अभ्यास तर होशील खराब

अंतरा २
Sis: मस्ती तुझी सारी आवर बे पोट्टे
खाशील तू शाळेतल्या टिचरचे रट्टे
शाळेला बुट्टी मी मारीन शहाणा
क्रिकेटच्या प्रॅक्टिसचा सांगेन बहाणा
धुडगुस घालू जरा
डोक्यावर घेऊ शाळा
चला चला कल्ला करुया

Sis: केलास जर अभ्यास तर होशील नबाब
फुकट खेळाच्या नादाने होशील खराब

MS: खेळाच्या नादाने वाढेल रे रुबाब
केलास जर अभ्यास तर होशील खराब

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top