Maifil Shabd Suranchi – 09 June 2019 – Tilak Smarak Mandir Pune
०९ जुन २०१९, टिळक स्मारक मंदीर, पुणे. मैफिल शब्द सुरांची
ह्या कार्यक्रमाचा प्रयोग ०९ जुन २०१९ रोजी टिळक स्मारक मंदीर, पुणे येथे सादर झाला.
सोनाली लोहार, एक प्रेक्षक, श्रोत्या आणि चाहत्या, यांनी केलेले कार्यक्रमाचे विवेचन……….
🎵🎵🎵🎵‘चालला गजर, जाहलो अधिर
लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन
आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस
धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी
याच मंदिरी माऊली माझी…!’🎵🎵🎵
अशी जर कार्यक्रमाची सुरूवात झाली तर काय…म्हणजे पुढे काय काय होणार आहे याचा तुम्ही अंदाज लावूच शकता. एखादी गोष्ट, एखादं गाणं, एखादी व्यक्ती जर आवडली तर ती पुन्हा पुन्हा ऐकू वाटते त्या व्यक्तीला सतत भेटावसं वाटतं की नाही? अगदी तसंच माझं झालं. मैफिल शब्द सुरांची हा कार्यक्रम मागच्यावेळी इतका आवडला ना की परत बघायला मी स्वतःला रोखूच शकले नाही. पण खरं सांगू दुस-यांदा बघताना सुद्धा मला अजिबात असं वाटलं नाही की तेच तेच ऐकतेय मी.
गाणं सुचतं कसं किंवा चाल कशी सुचते यावर आज ही मंडळी थांबलीच नाही त्यापलिकडे जाऊन गाणी तयार कशी होतात? गाण्यातील विविधता या सर्व गोष्टी अगदी विस्तारीतपणे कळाल्या. विशेष म्हणजे ठाकूर साहेबांची आणि राहूल दादाची जी काही अजरामर गाणी आहेत ती कशी घडली, त्याच्या मागचे विविध किस्से विविध अनुभव एकदंरीत खूपच मस्त. पण मला ना राहूल दादाचं, चाल कशी सुचते यावरच उत्तर खूप आवडलं ते म्हणजे तो म्हणतो,”शब्द माझ्याकडून कोणते सूर मागत आहेत त्यावरून मला चाल सुचते!” म्हणजे काय आणि कसं सुचतं ना यांना मला तर कळतच नाही.
राहूल रानडे ची चालीवरची पकड आणि शब्दप्रभू ठाकूर साहेबांच्या शब्दांची जादू तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. संगीतकार म्हणून आणि गीतकार म्हणून एका गाण्याकडे बघण्याचे दोन विविध पैलू एक प्रेक्षक म्हणून अनुभवताना वेगळीच मजा येते. विशेष म्हणजे त्यांचे किस्से एक से एक क मा ल. अंजली मराठे you were like cherry on the super awesome chocolate cake! अंजली ताई खूपच सुंदर आवाच आहे तुझा😘😘😘
माझा एक खूप आवडीचा RJ आणि एक खूप चांगला माणूस आज कार्यक्रमाला आला होता तो म्हणजे RJ बंड्या. त्याने एक प्रश्न विचारला जो मला प्रचंड आवडला तो म्हणजे,”एखादं गाणं किंवा एखादी कलाकृती बनवून झाल्यानंतर सुचण्याची शक्ती संपेल अशी कधी भीती वाटते का?
दुस-याच क्षणाला दोघांचीही उत्तर तयार.
राहुल रानडे- प्रत्येक गाण्यानंतर
गुरू ठाकूर- प्रत्येक चाल आल्यावर
हे ऐकताना मी म्हणजे😕😳
अरे काय……..!
कार्यक्रमाच्या शेवटाला आल्यावर एक विशेष गोष्ट घडते ती म्हणजे, प्रेक्षकंच विषय सुचवतात, शब्द देतात, प्रकार सांगतात आणि यावरून ठाकूर साहेब तिथेच अगदी बसल्या ठिकाणी गाणं रचतात आणि राहूल दादा आमच्याच समोर त्याला चाल देतो आणि कहर म्हणजे प्रेक्षकच सर्वजण मिळून ते गातातही. खरंतर शब्दसम्राट समोर बसलेले असताना आपण त्यांना शब्द सांगायचे म्हणजे जरा तारांबळच उडते पण असा अनुभव मिळायला ही भाग्य लागतं. म्हणजे त्यावेळेत आलेले फोन नाही उचलले आणि त्यांना पुन्हा फोन केल्यावर काय सांगाल……..”हा ते गुरू ठाकूर आणि राहूल रानडे यांच्यासोबत जरा गाणं बनवत होतो….”🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 चेष्टेचा विषय बाजूला ठेवला तर खरंच नेहमी नवे प्रेक्षक, नवा विषय, नवे शब्द, नवी चाल आणि अगदी नवं कोरं करकरीत गाणं हे म्हणजे Treat to watch!!!!!
खूपच सुंदर उपक्रम आणि हो आजच्या कार्यक्रमातला प्रेक्षकांसमवेत बनवलेला मुखडा,
‘ओठांवरले बरेच काही
स्पर्शातून कळू दे,
हुरहुरत्या ह्रृदयाची भाषा,
मिठीत तुझ्या उमलू दे!!!!!!!’
No words for this….🤐🤐🤐🤐🤐🤐
Rahul Ranade आणि Guru Thakur I love uhhhhh both for this❤🥰🥰🥰😘😘😘
मग कोण कोण येणार पुढच्या वेळेस एक नविन गाणं बनवायला????
-सोनाली लोहार
अरे वाह, किती छान! …कार्यक्रम ही आणि सोनालीचे writeup ही.. मस्तच!
रसिकांमध्ये मिसळण्याचा हा अनुभव तुम्हालाही काहीतरी नवीन देऊन जात असेल ना…
प्रत्येक मैफिल ही अशी वेगवेगळ्या अनुभवाने गाजत असेल ना …
ती निर्विवादपणे अशीच गाजत राहू देत,ही सदिच्छा.