Majhi Pandharichi Maay
माझी पंढरीची माय…मुखदर्शन !!
पुन्हा एकदा माऊलीचा गजर …….
गीत: गुरू ठाकूर
संगीत: अजय – अतुल
करकटावरी ठेवोनी ठाकले विटेवर काय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
साजिरे स्वरूप सुंदर तानभूक हारपून जाय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
ना उरली भवभयचिंता रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
तू कळस तूच रे पाया मज इतुके उमजुन जाता
राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता
लोचनात त्रिभूवन आवघे लेकरांस गवसुन जाय
माझी पंढरीची माय ,माझी पंढरीची माय….
संपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो
जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो
कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो
सावळ्या सुखात इतुकी अोंजळी भरावी हो
भाबडा भाव अर्पिला उधळली चिंता सारी हो
शरण गे माय आता लागले चित्त हे तुझीया दारी हो
विझल्या मनातली दिपमाळ चेतली
बळ आज माऊली तुझे दे
‘मी’ तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय …
अंतरी मिळे पंढरी .सावळा हरी ..भेटला तेथ
बोलला कुठे शोधीशी.. मला दशदिशी ..तुझ्या मी आत
जाहलो धन्य ..ना कुणी अन्य.. सांगतो स्वये जगजेठी
तेजात माखले प्राण ..लागले ध्यान.. उघडली ताटी
ना उरली भवभयचिंता रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
‘मी’ तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
विठू माउलीच्या लेकरांना कार्तीकी एकादशीच्या शुभेच्छा!!!!
गेले कित्येक दिवस माझी playlist ह्याच गाण्यावर आहे, अलौकिक सात्विक समाधान आहे या शब्दांत,
तू कळस तूच रे पाया मज इतुके उमजुन जाता
राउळात या देहाच्या मी तूलाच मिरवीन आता।।
अश्याच मनातल्या विझल्या दीपमाळा उजळत राहोत तुमच्या शब्दांनी…
राम कृष्ण हरी _/\_
Great !!! Best song….!!
1) कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो..
2) ‘मी’ तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय..
Excellent aahe song