www.guruthakur.in
  • Search
  • Menu
  • Twitter
  • Facebook

Gaaj Yeta Go

Virle Naate Kevhaa

Gaaj Yeta Go

तुका साद तुझ्या माहेराची वाट दिता गो
कानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो

फेसाळली लाट
वेडी पायवाट
कानी येती आज पायजणां
मायेचा पदर
फुलला मोहर
पानो पानी सूख माइना
चोरपावलानी
हळू येता कोणी
डोळ्याच्या काठानी
ऊनहून पाणी
तेची टिपूर टिपूर चाहूल दिता गो

जाईजुई चाफा – वाऱ्यावर तेचो दर्वळ गो
रानभर हाका – अजून तुला देती अोहळ गो
जाईजुई चाफा
रानभर हाका
दारात सायली तुझी सय सांगते
चिमणीचा खोपा
पारंबीचा झोका
तुळस अंगणी तुझी वाट पाहते

नादावली सये आज पुन्हा पाउले
गंध सा-या या आठवणींचा उरी
वळीव भरुन भरुन येता गो

Virale Naate Kevhaa

विरले नाते केव्हा कसे जीवना
चुकण्या आधी कळले कसे ना कुणा
धूसर झाले का ते
क्षण गुलाबाचे सारे
दिवस भासांचे नी
अधिर स्पर्शाचे कारे
विझून गेले ते
बहर आशेचे
स्वप्ने..गेली..हरवुन का…
वचने..वेडी..मुठीत रित्या

अंतरा – १
अाहे अजूनी जरी हात हाती
निसटून गेले काहीतरी
का कोण जाणे अंधारले
हे जाणीवांच्या वाटेवरी
मृगजळा परि आता
संवाद झाले
धुमसते मन रिते
तरीही सावरेना
विरले नाते केव्हा कसे जीवना
चुकण्या आधी कळले कसे ना कुणा

अंतरा – २
दाटून येते आतून काही
गोठून जाते अर्ध्यावरी
का सापडेना शोधूनही
जो बंध होता जन्मांतरी
हरवले सूर कुठे
अलवार सारे
उसवली वीण कधी
सुटली गाठ केव्हा
विरले नाते केव्हा कसे जीवना
चुकण्या आधी कळले कसे ना कुणा

Ghuma Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in[nolink] | Powered by: Mastrait
Scroll to top
WP-Backgrounds Lite by InoPlugs Web Design and Juwelier Schönmann 1010 Wien